सुपर इंटरनेट!

फास्टर, पॉवरफुल, अधिक सुरक्षित आणि अधिक खासगी असे एक इंटरनेटच व्हर्जन म्हणजे सुपर इंटरनेट. ‘सुपर इंटरनेट’ ही नवीन संकल्पना आहे. जाणून घ्या या सुपर इंटरनेटचा एक्सेस मिळवत त्याचा वापर कसा कराल.

super-internet
सुपर इंटरनेट

फास्टर, पॉवरफुल, अधिक सुरक्षित आणि अधिक खासगी असे एक इंटरनेटच व्हर्जन म्हणजे सुपर इंटरनेट. एरव्ही सर्वसामान्य इंटरनेट युजर्सना वापरता येणार्‍या फीचर्सहून अधिक फीचर्स या इंटरनेटच्या व्हर्जनमध्ये वापरणे शक्य आहे. येत्या काळात सुपर इंटरनेटचा प्रभाव वाढणार आहे, त्याचे कारण म्हणजे लाखो लोकांना तसेच अनेक एंटरप्राईजेसना आपल्या व्यवसायासाठी सुपर इंटरनेटचा वापर करून अधिकाधिक नफा मिळवणे शक्य होईल. अनेकांसाठी ‘सुपर इंटरनेट’ ही नवीन संकल्पना आहे. जाणून घ्या या सुपर इंटरनेटचा एक्सेस मिळवत त्याचा वापर कसा कराल.

सुपर इंटरनेट वापरताना तुम्हाला पासवर्ड वापरावा लागत नाही. तसेच नकोशी जाहिरात पाहण्याची वेळही तुमच्यावर येत नाही. तुम्हाला इंटरनेट वापरादरम्यान ट्रॅकही केले जात नाही. प्रत्येक पेज हे एचटीटीपीएस स्वरूपातील असते. एखाद्या वेबपेजवर तुमचा रजिस्टर केलेला पासवर्ड जरी लिक झाला तरीही सुपर इंटरनेट तुम्हाला तत्काळ त्याबाबतची माहिती देते. क्लाऊड अ‍ॅप्लिकेशनदेखील दहापटीने अधिक उत्तम परफॉर्म करणारे आहे.

सुपर इंटरनेटचे जीमेल व्हर्जन वापरून ईमेल वापरणे आणि एसएमएस मिळवणे शक्य आहे. एचटीएमएलचा वापर करून आऊटगोइंग ईमेल एडिट करणे, नोटीफिकेशन ब्लॉक करणेही शक्य आहे. तर सोशल मीडिया साईट्ससाठीही मोठ्या प्रमाणावर अ‍ॅडव्हान्स फीचरचा समावेश यामध्ये आहे. ट्विटरच उदाहरण घ्यायचे तर ऑटो रिफ्रेशिंग स्ट्रिम, वन बटन अकाऊंट स्विचिंग, इंस्टंट अ‍ॅण्ड ऑटोमॅटिक फॉलोइंग, अनफॉलोइंग यासारख्या असंख्य फीचर्सचा यामध्ये समावेश आहे. ई कॉमर्स साईटवर उपलब्ध असणारी उत्पादने सुपर इंटरनेटवर तुलनेने स्वस्त किंमतीत उपलब्ध असतात.

सर्व फोटो डाऊनलोड करण्यासाठी वन बटनचा पर्याय, सर्व पिक्चर्स झुम करता येणे तसेच हाईड करणेही शक्य होते. सुपर इंटरनेटच्या मोबाईल व्हर्जनवर वेबसाईट व्हर्जनच्या तुलनेत अधिक फीचर्स उपलब्ध आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो तसेच व्हीडिओ अपलोड करणे किंवा डाऊनलोड करणे शक्य आहे.

सुपर इंटरनेट अधिक वेगवान, सोपे, अधिक बलशाली आणि कार्यक्षम असे इंटरनेटचे व्हर्जन आहे. हे सगळे शक्य आहे ते क्रोम एक्सटेंशनमुळे. गुगल पिक्सेलबुकच्या वापरातून सुपर इंटरनेट वापरणे सहज शक्य आहे. पिक्सेलबुक हे गुगलच थोडे महागडे क्रोमबुकच म्हणावे लागेल. जिथे सामान्य इंटरनेट वेब ब्राऊजर एकाचवेळी अनेक टॅबचा लोड वापरात घेऊ शकत नाही तेव्हा सुपर इंटरनेट मात्र पिक्सेलबुकमुळे हे सहजपणे ऑपरेट करू शकते हे या ब्राऊजरचे वैशिष्ट्य आहे.