अरे बापरे! कोणत्याही वेदनेशिवाय होणार एका मिनिटात मृत्यू, ‘या’ देशाने दिली सुसाइड मशीनला मंजूरी

एक्झिट इंटरनॅशनल या कंपनीने हे सार्को नावाचे मशीन तयार केले आहे ज्याला सुसाइट पॉड असे नाव देण्यात आले आहे.

switxerland approves suicide machine Death in minute without any pain
अरे बापरे! कोणत्याही वेदनेशिवाय होणार एका मिनिटात मृत्यू, 'या' देशाने दिली सुसाइड मशीनला मंजूरी

जगभरात दररोज आत्महत्या करण्याची संख्या प्रचंड आहे. मात्र ऐकीकडे जगभरात आत्महत्या न करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. तर दुसरीकडे यूरोपातील एका देशाने आत्महत्या करण्यासाठी एक खास मशीन तयार केले आहे. या मशीनच्या मदतीने माणूस केवळ एका मिनिटात आत्महत्या करू शकतो आणि ते ही कोणत्याही वेदनेशिवाय. ही बातमी वाचून सर्वांनाच धक्का बसेल पण यूरोपातील स्विझरलँडमध्ये आत्महत्या करण्यासाठी हे मशिन तयार करण्यात आलं आहे. या मशिनची सध्या जगभर जोरदार चर्चा सुरू आहे.

स्वित्झर्लंडने तयार केलेली ही मशीन माणसाला वेदनारहित आणि शांततापूर्ण मृत्यू देणारी आहे. अकोफिन आकाराची ही एक कॅप्सूल आहे. स्वित्झर्लंडमध्ये या मशीनला कायदेशी परवानगी देण्यात आली आहे. स्वेच्छा मरण हवे असणाऱ्या लोकांसाठी ही मशीन तयार करण्यात आली आहे. एक्झिट इंटरनॅशनल या कंपनीने हे सार्को नावाचे मशीन तयार केले आहे ज्याला सुसाइट पॉड असे नाव देण्यात आले आहे.

या पॉडमध्ये ऑक्सिजन पातळी केवळ २१ ते १ टक्के वेगाने कमी करण्यात येते. पॉडच्या आत नायट्रोनज वायू सोडण्यात येतो आणि यामुळे व्यक्ती किंचितसा विचलीत होतो. शरिरातील सर्व स्नायू पूर्ण लखवा मारल्यासारखे होतात. यात डोळ्यांची थोडीफार हालचार करता येते. ही मशीन स्वेच्छा मरण घेणाऱ्या व्यक्तीच्या आवडत्या ठिकाणी नेता येते त्याचप्रमाणे व्यक्तीचा प्राण गेल्यानंतर बायोडिग्रेडेबल कॅप्सूलपासून वेगळे केले जाऊ शकतात आणि तिच कॅप्सूल शवपेटी म्हणून देखील वापरली जाऊ शकते.

स्वित्झर्लंडमध्ये मागील वर्षी या मशीनचा वापर करुन सुमारे १३०० लोकांना स्वेच्छा मरण देण्यात आले. स्वित्झर्लंडमध्ये सहाय्यक आत्महत्या या कायदेशीर मानल्या जातात. तर काहींनी ही मशीन लोकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असल्याचे म्हटले आहे. ही मशीन एक प्रकारे गॅस चेंबर असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

विसाव्या शतकातही जगातील अनेक देशांमध्ये आत्महत्या करणे हा गंभीर गुन्हा आहे मात्र आत्महत्या आणि स्वेच्छा मरणला कायदेशीररित्या मान्यता देणारा स्वित्झर्लंड हा पहिलाच देश नाहीये. आतापर्यंत स्पेन,लक्झेम्बर्द,बेल्जीयम,कॅनडा आणि कोलंबिया या देशांनी देखील आत्महत्या किंवा स्वेच्छा मरणाला कायदेशीररित्या परवानगी दिली आहे.


हेही वाचा – तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट आहे, तर ही बातमी नक्की वाचा