घरअर्थसंकल्प २०२२Budget 2022: Animation, गेमिंग आणि कॉमिक्सला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात येणार टास्क...

Budget 2022: Animation, गेमिंग आणि कॉमिक्सला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात येणार टास्क फोर्स

Subscribe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प २०२२ सादर केला. भाषणाच्या सुरुवातीला निर्मला सीतारामन यांनी कोरोना महामारीचा उल्लेख केला आणि या महामारीच्या काळात भारतात विकास यात्रा कायम ठेवेल अशी अपेक्षा असल्याचे म्हटले. दरम्यान अॅनिमेशन (Animation), व्हिच्युअल इफेक्ट्स (Visual Effects), गेमिंग (Gaming) आणि कॉमिकला (Comic) प्रोत्साहन देण्यासाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात येणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेतील आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाल्या की, ‘राज्यांना माहिती तंत्रज्ञानावर आधारित जमीन दस्तऐवज व्यवस्थापनासाठी युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन क्रमांक स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले जाईल. AVGC क्षेत्रात तरुणांना रोजगार देण्याची प्रचंड क्षमता आहे, त्यामुळे सर्व भागधारकांसह एक टास्क फोर्स तयार केला जाईल, जे आपल्या बाजारपेठेसाठी आणि जागतिक मागणीसाठी देशांतर्गत क्षमता निर्माण करेल. ई-श्रम, नॅशनल करिअर सर्व्हिस आणि असीम पोर्टलला एकमेकांशी जोडले जातील आणि त्यांची व्यापती वाढवली जाईल.’

- Advertisement -

लवकरच ५जी सेवा सुरू होणार 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, ‘येत्या काळात टेलिकॉम क्षेत्र आणि ५ जी मोठ्या प्रमाणात नोकऱ्या देणार आहेत. ५जी प्रोडक्शन मॅनेजमेंटसोबत जोडण्यासाठी एक मोठी योजना लाँच केली जात आहे. शहराप्रमाणे सर्व डिजिटल सुविधा ग्रामीण भागात मिळाल्या पाहिजेत, प्रत्येक सुविधा ही शहरी भागाप्रमाणेच असली पाहिजे आणि तिथेल नागारिक सुद्धा विकासासाठीच्या प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजेत. त्यानुसार ऑप्टिकल फायबरचा सर्वत्र वापर करण्याची ही योजना आहे. त्याचे काम सुद्धा सुरू झाले आहे. येत्या काळातही ही योजना पूर्ण होणार आहे. तसेच २०२२ मध्ये देशात ५जी सेवा सुरू होणार आहे. गावागावांमध्ये ब्रॉडबँड सुविधा उभारल्या जाणार आहेत.’


हेही वाचा – Budget 2022: अर्थसंकल्पातून काय मिळाले? काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -