टाटाची Nexon XM(S) लाँच; किंमत ८ लाखापासून सुरु

tata nexon xm s

टाटा मोटर्सने (Tata Motors) बुधवारी आपल्या नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही नेक्सॉनचे (Nexon) नवीन व्हेरियंट Nexon XM(S) लाँच केलं आहे. प्रीमियम फीचर्ससह या कारची दिल्ली एक्स शोरूम किंमत ८.३६ लाख ते १०.३० लाखांदरम्यान सुरू होते. नवीन नेक्सॉन दोन्ही पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. मॅन्युअल आणि ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रांसमिशन (एएमटी) असे दोन ट्रान्समिशन ऑप्शन्स असतील. भारतीय बाजारात Hyundai Venue, Mahindra XUV300, Maruti Suzuki Vitara Brezza, Ford EcoSport या कारसोबत स्पर्धा असणार आहे.

सेफ्टी फीचर्स

टाटा नेक्सॉन (TATA Nexon) च्या सेफ्टी फीचर्समध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन कंट्रोल, रोलओव्हर मिटिगेशन, हिल होल्ड कंट्रोल, इमर्जन्सी ब्रेक असिस्ट, ईबीडी, एबीएस, ISOFIX, हाइट एडजस्टेबल सीट बेल्ट्स,, रिव्हर्स पार्किंग असिस्ट इ. समावेश आहे.

किंमत आणि इंजिन पॉवर

Nexon XM(S) मॅन्युअल आणि एएमटी दोन्ही प्रकारामध्ये उपलब्ध आहे. नेक्सॉन मॅन्युअलच्या पेट्रोल आणि डिझेल प्रकारांची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे ८.३६ लाख आणि ९.७० लाख रुपये आहे. त्याचबरोबर XM(S एएमटीच्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत ८.९६ लाख रुपये आहे, तर डिझेल व्हेरिएंटची किंमत १०.३६ लाख रुपये आहे.

नेक्सॉनचे १.२ लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन 120hp पॉवर आणि 170Nm चा टॉर्क जनरेट करते. १.५ लीटर डिझेल इंजिन 110hp पॉवर आणि 260Nm टॉर्क जनरेट करते. ट्रांसमिशनबद्दल बोलायचं झालं तर दोन इंजिन पर्यायांसह ६ स्पीड मॅन्युअल किंवा एएमटीमध्ये उपलब्ध आहे. टाटा हा एकमेव डिझेलसह पेट्रोल एएमटी पर्याय देत आहे.