घरटेक-वेकTCL ने भारतात लाँच केली 'व्हिटॅमिन सी फिल्टर' एसी! बघा किंमतीसह फीचर्स

TCL ने भारतात लाँच केली ‘व्हिटॅमिन सी फिल्टर’ एसी! बघा किंमतीसह फीचर्स

Subscribe

ग्लोबल टॉप -2 टीव्ही कॉर्पोरेशन टीसीएलने भारतीय बाजारात नवीन आणि अनोखे फीचर्स असणारी एसी लाँच केले आहे. कोरोना व्हायरसपासून संरक्षण मिळवण्यासाठी टीसीएसएलने एक इनोव्हेटिव्ह एसी लाँच केली आहे. ही एक अल्ट्रा-इनव्हर्टर एसी आहे, जी 3-इन -1 फिल्ट्रेशन तंत्रज्ञानासह ग्राहकांसाठी उपलब्ध आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी फिल्टर, सिल्व्हर आयन आणि डस्ट फिल्टर असा फीचर्सचा समावेश आहे. यामुळे केवळ हवेपासून धूळ आणि जीवाणू काढून टाकत नाही तर ग्राहकांना मॉइस्चरायझिंग इफेक्ट देखील ही एसी प्रदान करते.

नवीन एसीच्या लॉन्चिंग दरम्यान, टीसीएल इंडियाचे एसी बिझनेस हेड विजय कुमार मिक्कीलिनेनी यांनी असे सांगितले की, “ कोरोना महामारीने बहुतेक कंपन्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. हा बदल मालकांसाठी तसेच कर्मचार्‍यांनाही सोपा नव्हता. मात्र आमच्या व्हिटॅमिन सी फिल्टर एसीद्वारे आम्ही या लोकांना केवळ एक आरामदायक आणि शांत वर्क फ्रॉम होमसाठी सेटिंग प्रदान करीत नाही तर ते हाई-प्रोडक्टिविटीच्या जीवाणूमुक्त वातावरणात काम करतात याची खात्री देखील देतो ‘ अल्ट्रा-इनव्हर्टर एसी टीसीएलच्या मालकीचे टायटन गोल्ड इवेपोरेटर आणि कंडेनसरसह १००% पर्यंत कॉपर ट्यूबिंगसह सुसज्ज आहे, जे पृष्ठभागावर धूळ जमा होण्यास प्रतिबंध करते आणि उत्पादनाच्या दीर्घ आयुष्यास सुनिश्चित करते. हे तपमान साधारण ३० सेकंदात १८ डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी करून जलद कूलिंग देखील प्रदान करते.

- Advertisement -

कंपनीचा असा दावा आहे की, ही एसी कमी फ्रिक्वेंसी ऑपरेशनसाठी एक आदर्श उत्पादन आहे. जी एसी ५० टक्के वीज बचत सुनिश्चित करते, म्हणूनच कमी वीज बील कमी येते. इतर फीचर्सबद्दल सांगायचे तर R32 इको-फ्रेंडली रेफ्रिजरेंट, ‘फोर-वे एअरफ्लो, गुगल असिस्टंट, टीसीएल होम ,प, डिजिटल डिस्प्ले आणि हाई-प्रिसिजन तापमान शोधण्यासाठी ‘आय फील टेक्नॉलॉजी’ समाविष्ट आहे. या एसीची किंमत २७ हजार ९९० रुपये आहे.


Vaccine: २ वर्षांवरील मुलांना ‘या’ महिन्यात मिळणार covaxin लस, AIIMSच्या डॉक्टरांची माहिती

 

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -