घरटेक-वेक'टेक्नो'चे २ नवीन स्मार्टफोन्स बाजारात !

‘टेक्नो’चे २ नवीन स्मार्टफोन्स बाजारात !

Subscribe

टेक्नो कंपनीने खास जिओ युझर्ससाठी या दोन्ही फोन्सच्या खरेदीवर इंन्स्टंट कॅशबॅकची सुविधा दिली आहे.

टेक्नो या गॅजेट निर्मिती करणाऱ्या कंपनीने नुकतेच दोन नवीन स्मार्टफोन्स बाजारात लाँच केले आहेत. ‘कॅमोन आयएस’ आणि ‘कॅमोन आयक्साय-2’ असे हे दोन नवे फोन आता भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ‘कॅमोन आयएस’ फोनची किंंमत ६ हजार ७९९ रुपये आहे आणि ‘कॅमोन आयक्साय-2’ ची किंमत ७ हजार ४९९ रुपये इतकी आहे. त्यामुळे हे दोन्ही फोन ग्राहकांना परवडणारे बजेट फोन असल्याचं, ट्रान्सन इंडियाचे मुख्य वितरण अधिकारी गौरव टिकू यांचं म्हणणं आहे.  गौरव टिकू म्हणतात, ”कंपनीने या दोन्ही फोन्समध्ये ग्राहकांना सर्व आवश्यक फिचर्स, कमीत कमी किंमतीमध्ये देण्याता प्रयत्न केला आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ‘iAce’ आणि ‘iSky 2’ हे दोन्ही फोन्स नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत.” दरम्यान ‘iAce’  हा फोन विक्रीसाठी उपलब्ध झाला असून, ‘iSky 2’ हा फोन येत्या २० ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. शिवाय टेक्नो कंपनीने जिओ युझर्ससाठी इंन्स्टंट कॅशबॅकची सुविधा दिली आहे.
हेही वाचा: कमी किंमतीचे ३ नवीन iPhone 
Tecno Camon iACE and iSKY-2
सौजन्य- knocksense.com

iAce आणि iSky 2 चे फीचर्स

  • आर्टिफिशिअल इंटलिजन्स असलेला 13 MP कॅमेरा
  • 5.5 इंचाचा HD डिसप्ले
  • 3 हजार 50 एमएच क्षमतेची बॅटरी
  • खास ‘फेस अनलॉक’ फिचर
  • 1.5 गीगाहर्ट्स क्वॉर्डकोअर 4 बीट प्रोसेसर, 2 GB रॅम
  • 16 GB इंटरनल मेमरी – 128 GB पर्यंत एक्सपांडेबल मेमरी
  • अँड्रॉईडची 8.1 Oreo ऑपरेटींग सिस्टीम
हेही वाचा: ‘Moto Z3’ जगातला पहिला 5G स्मार्टफोन

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -