Mobile Simcard च्या नियमांमध्ये झाला बदल,घरबसल्या करु शकता KYC अपडेट

telecom new rule 2021 modi govt changed telecome releted rule
Mobile Simcard च्या नियमांमध्ये झाला बदल,घरबसल्या करु शकता KYC अपडेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत झालेल्या केंद्रिय कॅबिनेट बैठकीत गेल्या काही दिवसांपूर्वी मोबाईल यूजर्सशी निगडीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सरकार तर्फे मोबाईल कनेक्शन घेण्यासाठी किंवा त्याला प्री- पेड सर्विस पासून पोस्टपेड आणि पोस्टपेड ते प्री-पेडमध्ये कन्वर्ट करण्याची प्रक्रिया आता सोप्पी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या सोबतच घरबसल्या KYC संबधीत सर्व कामकाज आता ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर नवीन मोबाईल नंबर घेतल्यानंतर डिजीटल मोडने KYC भरावा लागले. याचप्रमाणे ग्राहकांना सिम कनेक्शन बदलने तसेच सिम पोर्ट करने यासाठी कोणताही फॉर्म भरण्याची गरज भासणार नाही.

क्रेंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे यूजर्स ऑनलाइन मोडने KYC फिल करु शकणार आहेत. हि संपूर्ण प्रक्रिया अॅप बेस्ट असणार मात्र ऑनलाइन म्हणजेच e-KYC साठी यूजर्संना 1 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तसेच प्री- पेड सर्विस पासून पोस्टपेड आणि पोस्टपेड ते प्री-पेडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी यूजर्संना नवीन KYCची गरज भासणार नाहिये. आता कोणताही यूजर्स या सुविधेचा लाभ घेऊ शकतो.

टेलिकॉम कंपनितर्फे नविन फॉर्म भरण्यापासून ते पोर्ट करण्याची प्रक्रिये दरम्यान यूजर्संना आधार कार्ड, ड्रायविंग लायसन्स एक फोटो आणि सही करावी लागेल. यानंतर टेलिकॉम कंपनीतर्फे डिजीटल KYC प्रक्रिया सुरू करण्यात येईन. मात्र कागदपत्र जमा करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे कारण अनेकदा चूकीच्या कागदपत्रामूळे संपूर्ण कामकाजमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता वाढते.तसेच यानंतर KYC करीता टेलिकॉम कंपनी ग्राहकांकडून काही कागदपत्राची मागणी करते आणि हे कागदपत्र ग्राहकांना टेलिकॉम एजंन्सी किंवा फ्रेन्चयाझीसकडे जमा करण्यास जावे लागते. मात्र हे काम आता घर बसल्या सेल्फ KYC ने ग्राहक करु शकतात.


हे हि वाचा – Rajya Sabha Bypoll : राज्यसभेवर राजीव सातव यांच्या जागी काँग्रेसमधून दोन नावांची चर्चा, तर भाजपाकडून उमेदवार जाहीर