घरटेक-वेकस्वस्त iPhone १५ एप्रिलला लाँच होणार; जाणून घ्या किंमत

स्वस्त iPhone १५ एप्रिलला लाँच होणार; जाणून घ्या किंमत

Subscribe

iPhone SE 2 १५ एप्रिल रोजी लाँच होण्याची शक्यता आहे. या फोनला ए १३ बायोनिक प्रोसेसर दिलं जाण्याची शक्यता आहे.

अनेकांना एकदातरी आयफोन वापरण्याची इच्छा असते. मात्र आयफोनच्या किंमतीमुळे अनेकजण हा फोन घेणं टाळतात. पण आता स्वस्त आयफोनची प्रतिक्षा संपुष्टात येऊ शकते. अॅपल कंपनीचा स्वस्त आयफोन लवकरच बाजारात येणार आहे. आयफोन SE 2 किंवा आयफोन ९ ची बर्‍याच दिवसांपासून चर्चा आहे. हा स्वस्त आयफोन प्रथम ३१ मार्चला लाँच होणार होता, त्यानंतर ती तारीख बदलून ३ एप्रिल करण्यात आली आणि आता हा फोन १५ एप्रिल रोजी बाजारात येणार असल्याची चर्चा आहे. सध्या या आगामी स्वस्त आयफोनच्या नावाची खातरजमा झालेली नाही, कारण काही अहवालात त्याला iPhone SE 2 आणि काहींमध्ये आयफोन ९ असं म्हटलं आहे. तथापि, हा दुसरा स्वस्त आयफोन असेल. २०१६ मध्ये लॉन्च झालेल्या iPhone SE मध्ये अपग्रेडेड व्हर्जन म्हणून हा लाँच केला जाणार आहे.


हेही वाचा – डॉक्टरांना विचारल्याशिवाय हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेऊ नका; मृत्यू होऊ शकतो

- Advertisement -

या आगामी आयफोनची किंमत ही सर्वात मोठं ठळक वैशिष्ट्य आहे. कारण त्याची किंमत नियमित आयफोनपेक्षा कमी असेल. अंदाजे 30,400 रुपये एवढी या फोनची किंमत असेल. आयफोन iPhone SE याच किंमतीवर २०१६ मध्ये लाँच केलं होतं. या आयफोनच्या लाँचआधी अनेक रिपोर्ट्स लीक झाले आहेत. यात फोनची डिझाईन आणि फीचर्सची माहिती आहे. लाँच होणारा आयफोन हा २०१६ साली आलेल्या iPhone SE चे अपग्रेडेड व्हर्जन असणार आहे. या आयफोनच्या डिझाईन संदर्भात आलेल्या माहिती नुसार, या फोनमध्ये iPhone 8 चे फीचर्स पाहायला मिळतील. ए १३ बायोनिक प्रोसेसर दिला जाऊ शकतो. आयफोन एसई 2 चा ४.७ इंचाचा डिस्प्ले असू शकतो. कंपनीने आयफोन SE 2 मध्ये टच आयडी फीचर दिले होते. हा फोन गोल्ड, सिल्वर आणि ग्रे या तीन रंगात लाँच करण्याची शक्यता आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -