घरटेक-वेकभारतातील गेमिंग समुदायात पीसी गेमिंगचा वाढता प्राधान्यक्रम,एचपी अहवालात स्पष्ट

भारतातील गेमिंग समुदायात पीसी गेमिंगचा वाढता प्राधान्यक्रम,एचपी अहवालात स्पष्ट

Subscribe

र्व प्रतिसादकर्ते पीसी आणि/किंवा मोबाइल फोन वापरकर्ते होत. ते पीसी आणि स्मार्टफोनवर अॅक्शन आणि अॅडव्हेंचर गेम्सचा वापर करतात.

भारतातील गेमिंग समुदायात पीसी गेमिंगचा वाढता प्राधान्यक्रम असल्याचे एचपीने केलेल्या अभ्यास संशोधनात स्पष्ट झाले आहे. एचपी इंडिया गेमिंग लँडस्केप रीपोर्ट २०२१ मध्ये नमूद केल्यानुसार ८९ टक्के प्रतिसादकर्त्यांच्या मते स्मार्टफोनच्या तुलनेत पीसीवर अधिक चांगला गेमिंग अनुभव मिळतो. विशेष म्हणजे, दर १० पैकी ४ मोबाइल गेमर्सनी (३७ टक्के) गेमिंगसाठी पीसीकडे वळणार असल्याचे मत नोंदवले. अधिक चांगल्या अनुभवासाठी हा बदल केला जाणार आहे.भारतात मोबाइल फोन्सच्या तुलनेत पीसीचा वापर मर्यादित स्वरुपात आहे. त्यामुळे, पीसी गेमिंग क्षेत्रात वाढीच्या प्रचंड संधी असल्याचे स्पष्ट होते. गेमिंगसाठी पीसीकडे वळण्याला प्राधान्य दिले जाण्यामागे मिलेनिअल्स आणि जेन झेड प्रतिसादकर्त्यांचा (७० टक्के) तसेच कॅज्युअल आणि एन्थुझिआस्ट गेमर्स (७५ टक्के) यांचा मोठा वाटा आहे. द्वितीय श्रेणी शहरातील ९४ टक्के, प्रथम श्रेणी शहरातील ८८ टक्के आणि महानगरांमधील ८७ टक्के प्रतिसादकर्ते अशा प्रचंड मोठ्या संख्येने वापरकर्ते गेमिंगसाठी मोबाइलऐवजी पीसीला प्राधान्य देत आहेत.

पीसी ठरले भारतातील सर्वाधिक प्राधान्यक्रमाचे गेमिंग डिव्हाइस
एचपीच्या संशोधनानुसार दर १० पैकी ९ प्रतिसादकर्त्यांना वाटते की पीसीवर स्मार्टफोनच्या तुलनेत गेमिंगचा अधिक चांगला अनुभव लाभतो

- Advertisement -
ठळक वैशिष्ट्ये

• ३७ टक्के मोबाइल गेमर्सना पीसीचा वापर सुरू करायचा आहे, यातून या क्षेत्रात वाढीच्या प्रचंड संधी असल्याचे संकेत मिळतात
• ९० टक्क्यांहून अधिक प्रतिसादकर्त्यांना गेमिंग हा करिअरसाठी एक व्यवहार्य पर्याय आहे असे वाटते, यात महिला आघाडीवर आहेत
• महिला (५८ टक्के) पुरुषांच्या तुलनेत (५२ टक्के) अधिक प्रमाणात गेमिंग डिव्हाइस म्हणून पीसीला पसंती देतात
• ताणतणाव दूर करण्यासाठी स्ट्रेस बुस्टर म्हणून तसेच सोशलाइज करण्यासाठी आणि कुटुंबासोबतच बंध घट्ट करण्यासाठी गेमिंगचा वापर

गेमिंगसाठी मोबाइलऐवजी पीसीला प्राधान्य देण्यामागील महत्त्वाची कारणे नोंदवताना प्रतिसादकर्त्यांनी खालील मुद्दे मांडले : अधिक चांगला प्रोसेसिंग वेग, डिस्प्ले आणि ध्वनी ही गेमर्स पीसी गेमिंगकडे वळण्याची महत्त्वाची कारणे आहेत.

- Advertisement -

करिअरचा पर्याय म्हणून गेमिंग:

गेमिंग हा करिअरसाठी एक व्यवहार्य पर्यायही ठरत आहे. ९० टक्क्यांहून अधिक प्रतिसादकर्त्यांनी गेमिंग इंडस्ट्री हा व्यवहार्य करिअर पर्याय असल्याचे मान्य केले. कदाचित आश्चर्य वाटेल, मात्र ८४ टक्के महिला प्रतिसादकर्त्यांना आणि ८० टक्के पुरुष प्रतिसादकर्त्यांना गेमिंगमध्ये करिअर करायचे आहे. जेन एक्स (९१ टक्के) आणि शालेय विद्यार्थी (८८ टक्के) यांनाही असे वाटते. गेमिंग क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहणाऱ्यांचे प्रमाणे द्वितीय श्रेणी शहरात (८४ टक्के) प्रथम श्रेणी शहरांच्या तुलनेत (७८ टक्के) काहीसे अधिक आहे.

विविध भागांमध्ये भविष्यात करिअर म्हणून गेमिंगला दिला जाणारे प्राधान्य खालीलप्रमाणे:

• महिला, जेनझेड, पश्चिम भारतातील आणि द्वितीय श्रेणी शहरातील प्रतिसादकर्ते यांच्यात गेमिंगला करिअर म्हणून अधिक प्राधान्य आहे.

एचपी इंडिया मार्केटचे केतन पटेल म्हणाले, “माणसं घरातच अधिक वेळ सध्या घालवत आहे. ग्राहकांना मनोरंजन, ताण दूर करणे आणि सोशल कनेक्टसाठी नवनवे पर्याय हवे असल्याने गेमिंगमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या परिस्थितीत, गेमिंगचा सर्वाधिक सर्वसमावेशक अनुभव देणारे प्राधान्यक्रमाचे डिव्हाइस अशी पीसीची ओळख दृढ होत आहे. गेमर्सचा मोबाइलऐवजी पीसीकडे वाढता कल म्हणजे एचपीसाठी प्रचंड व्यावसायिक संधी उपब्लध असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. आमच्या पीसी पोर्टफोलिओमध्ये गेमिंग हा एक सर्वाधिक वेगाने वाढणारा विभाग आहे आणि आम्ही हाच वेग कायम राखू, भारतात आघाडीचा पीसी गेमिंग ब्रँड म्हणून असलेले आमचे स्थान अधिक बळकट करू, अशी आम्हाला आशा आहे.”

गेमिंगसोबतच या संशोधनात प्रतिसादकर्त्यांनी ते पीसीवर मनोरंजन (५४ टक्के), फोटो/व्हिडीओ एडिटिंग (५४ टक्के) आणि ग्राफिक डिझाइन (४८ टक्के) अशी महत्त्वाची कामेही करतात असे मत नोंदवले. यातून गेमिंग क्षमतांसोबतच पीसीमधील बहुविधता अधोरेखित होते.

ताण कमी करणारे गेमिंग :

एचपी इंडिया गेमिंग लँडस्केप रीपोर्ट २०२१ मधील निष्कर्षांनुसार ताण दूर करण्यासाठी स्ट्रेस बुस्टर म्हणून तसेच मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी, विशेषत: सध्या मर्यादित स्वरुपात एकमेकांना भेटण्याचे आव्हान असतानाच्या काळात पीसी गेमिंगचा वापर एकमेकांसोबत जोडले जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे. ९२ टक्क्यांहून अधिक प्रतिसादकर्त्यांनी हे मान्य केले की गेमिंगमुळे कामाचा/अभ्यासाचा ताण कमी होतो आणि स्ट्रेस कमी करून सकारात्मक भावना वाढीस लागतात. इतकेच नाही, ९१ टक्के प्रतिसादकर्त्यांना वाटते की सहकाऱ्यांच्या पातळीवर सोशलाइजिंगमध्ये गेमिंगचा फायदा होतो आणि त्यामुळे नवे मित्र जोडणे शक्य होते. त्याचप्रमाणे, ९१ टक्के प्रतिसादकर्त्यांच्या मते गेमिंगमुळे लक्ष देण्याची क्षमता आणि एकाग्रता वाढते.एचपी इंडिया मार्केटच्या पर्सनल सिस्टम्सचे वरिष्ठ संचालक विक्रम बेदी म्हणाले, “सध्याच्या काळात सोशल कनेक्ट टिकवून ठेवणे आणि सकारात्मक मानसिकता राखण्यात साह्य म्हणून तंत्रज्ञानाचे महत्त्व उल्लेखनीय आहे. गेमिंग म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी एक परिपूर्ण उपक्रम बनला आहे ज्यामुळे आपल्याला मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत वेळ घालवता येईल, त्यांच्यासोबत जोडले जाणे शक्य होईल. पीसी गेमिंग ही आता जागतिक संकल्पना बनली आहे आणि या क्षेत्रात करिअरच्या प्रचंड संधी आहेत. जागतिक पातळीवर चमकदार कामगिरी करण्यासाठी भारताला यातून मुबलक संधी मिळणार आहेतच. शिवाय, सर्वसमावेशक क्षमतांसह एक डिव्हाइस म्हणून पीसीमध्ये असलेले प्रचंड मूल्यही यामुळे अधोरेखित होते.”

पीसी खरेदी करताना ग्राहकांचा प्राधान्यक्रम

पीसी निवडताना, विशेषत: गेमिंगसाठी वापरकर्त्यांचा महत्त्वाचा प्राधान्यक्रम काय असतो, यावरही या सर्वेक्षणात विचार करण्यात आला आहे. सर्वेक्षणात सहभागी सर्व पीसी वापरकर्त्यांपैकी एक तृतीयांश (३३ टक्के) जणांनी खरेदीचा निर्णय घेताना गेमिंग वैशिष्ट्यांना प्राधान्य दिले. अधिक चांगला प्रोसेसिंग वेग (६५ टक्के) आणि ग्राफिक्स क्षमता (६४ टक्के) हा गेमिंग पीसी निवडतानाचा ग्राहकांचा महत्त्वाचा प्राधान्यक्रम होता.

पीसी गेमिंगमधील विकास, विभाग आणि भविष्यातील सुधारणांसाठीचे सर्वाधिक प्रतिसाद खालीलप्रमाणे :

• गेमर्सना गेमिंग पीसीकडून अधिक चांगले ग्राफिक्स, बॅटरीज आणि आकर्षक डिस्प्ले आणि थर्मल नाविन्यता अशा अपेक्षा आहेत.

थोडक्यात सांगायचे तर, एचपी इंडिया गेमिंग लँडस्केप रीपोर्ट २०२१मध्ये पीसी गेमिंगला भारतातील एक मुख्य प्रवाहातील घडामोड म्हणून नमूद करण्यात आले आहे आणि मानवी समाजात, विशेषत: या जागतिक संकटाच्या काळात पीसीची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे. सर्वच भौगोलिक प्रदेशांमधील वापरकर्ते पीसी गेमिंगकडे वळत आहेतच शिवाय सोशल कनेक्ट वाढवण्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठीही हे प्रभावी माध्यम ठरत आहे.

कार्यपद्धती

या सर्वेक्षणात मार्च आणि एप्रिल २०२१ या काळात भारतातील २५ महानगरे, प्रथम आणि द्वितीय श्रेणी शहरांमधील १५०० प्रतिसादकर्त्यांना सहभागी करून घेण्यात आले. SEC A1, A2 आणि B1 विभागातील १५ ते ४० या वयोगटातील पुरुष (७२ टक्के) आणि महिलांच्या (२८ टक्के) मुलाखती यासाठी घेण्यात आल्या. सर्व प्रतिसादकर्ते पीसी आणि/किंवा मोबाइल फोन वापरकर्ते होत. ते पीसी आणि स्मार्टफोनवर अॅक्शन आणि अॅडव्हेंचर गेम्सचा वापर करतात.


हे हि वाचा – KYC वेरिफिकेशनच्या नावे येणाऱ्या SMS पासून रहा सावध

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -