घरटेक-वेकलवकरच Marutiच्या ३ कार होणार लाँच; जाणून घ्या किंमत

लवकरच Marutiच्या ३ कार होणार लाँच; जाणून घ्या किंमत

Subscribe

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती आपली लोकप्रिय कार अल्टो (ALTO), विटारा ब्रेझा (Vitara Brezza) आणि सेलेरियो (Celerio) याचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच करण्याची तयार करत आहे. मारुतीच्या कार चांगल्या मायलेज आणि जबरदस्त परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात. लवकरच मारुती कंपनी या ३ कारचे नेक्स्ट जनरेशन मॉडेलला भारतीय बाजारात लाँच करणार आहे. ज्याची सुरुवातीची किंमत ३ लाख रुपये असेल. जर तुम्ही मारुतीची स्वस्त कार घेण्याचा विचार करत असाल, तर या ३ कारबाबत जाणून घ्या.

मारुती अल्टो (Maruti Alto)

मारुतीची सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय कार मारुती अल्टो आता देशातील सर्वात स्वस्त कार बनली आहे. आता कंपनी या कारचे नेक्स्ट जनरेशन लाँच करण्याच्या तयारीत आहे. माहितीनुसार, कंपनी याचे नेक्स्ट जनरेशन मॉडेलला Heartect प्लॅटफॉर्मवर तयार करत आहे. या प्लॅटफॉर्मवर कंपनीने सध्याच्या एस-प्रेसो (S-Presso) आणि वॅगनआर (Wagon R) कार तयार केली आहे. माहितीनुसार या प्लॅटफॉर्मचा वापर करून अल्टो सेकंड जनरेशन मॉडेलमध्ये जबरदस्त केबिन स्पेस पाहायला मिळू शकते. कंपनी या नेक्स्ट जनरेशन मॉडेलमध्ये ०.८ लीटर क्षमतेच्या इंजनचा वापर करेल, जे ४८ PSचे पॉवर आणि ६९ Nm टॉर्क जनरेटर करते. या कारची सुरुवातीची किंमत ३ लाख रुपयांपासून होऊ शकते.

- Advertisement -

मारुती सेलेरियो (Maruti Celerio)

कंपनी मारुती सेलेरियोचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी लवकरच बाजारात ही कार लाँच करू शकते. सेलेरियो कारला पहिल्यांदा कंपनीने २०१४ मध्ये लाँच केले होते. या कारच्या नेक्स्ट जनरेशन मॉडेलला बऱ्याच वेळेला टेस्टिंग दरम्यान स्पॉट केले होते. माहितीनुसार, याचा नेक्स्ट जनरेशन मॉडेलला Heartect प्लेटफॉर्मवर तयार करेल. यामुळे सेलेरियोचे नेक्स्ट जनरेशन मॉडेलमध्ये मस्त केबिन स्पेशन दिसेल. कंपनीच्या या कारमध्ये १.० के-सिरीज आणि १.२ लीटर पेट्रोल इंजनचा वापर करू शकते. मारुतीच्या या कारची सुरुवातीची किंमत ४.५ लाख रुपयांपासून ते ६.५ लाख रुपयांपर्यंत असू शकते.

मारुती विटारा ब्रेझा (Maruti Vitara Brezza)

मारुती विटारा ब्रेझाचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल कंपनी लवकरच भारतीय बाजारात लाँच करू शकते. याचे फेसलिफ्ट मॉडेलला कंपनीने गेल्या वर्षी ऑटो-एक्सपोमध्ये लाँच केले होते. पहिल्यांदा कंपनीने ही कार २०१६मध्ये लाँच केली होती. या कारच्या नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच करण्याची माहिती कंपनीकडून मिळाली नाही आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, कंपनी या कारमध्ये सध्याच्या इंजनचा वापर करेल. तसेच मारुतीच्या या कारमध्ये नवे चेचिस फ्रेम आणि माइल्ड हायब्रिड सिस्टम देखील देऊ शकते.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -