Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक भारतात यावर्षी लाँच होणार सर्वांत स्वस्त 'या' इलेक्ट्रीक कार

भारतात यावर्षी लाँच होणार सर्वांत स्वस्त ‘या’ इलेक्ट्रीक कार

Related Story

- Advertisement -

भारतात यावर्षी अनेक इलेक्ट्रिक कार्स लाँच होणार आहेत. यामध्ये अनेक विदेशी कंपन्यांच्या गाड्या आहेत. भारतीय बनावटीच्या गाड्यांचा देखील यात समावेश आहे. या गाड्यांबाबत ग्राहक खूप उत्सुक आहेत, कारण भारतीय बनावटीच्या असल्यामुळे गाड्यांच्या किंमती देखील कमी असून शकतात. आम्ही तुम्हाला अशाच काही भारतीय बनावटीच्या गाड्यांविषयी सांगणार आहोत, ज्या लवकरच बाजारात आणल्या जाऊ शकतात.

Mahindra XUV300 Electric

Mahindra XUV300 Electric चं इलेक्ट्रिक व्हर्जन लवकरच भारतात लाँच केलं जाण्याची शक्यता आहे. ही कार एकदा चार्ज केल्यावर २०० किमीपर्यंत जाऊ शकते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार या कारमध्ये ३८० व्होल्टची बॅटरी दिली जाऊ शकते. या गाडीचा टॉप स्पीड १६० किलोमीटर प्रतितास असण्याची शक्यता आहे.

Tata Altroz EV

- Advertisement -

टाटा अल्ट्रोज ईव्ही ऑटो एक्सपो 2020 मध्ये लाँच करण्यात आली आहे. टाटा अल्ट्रोज ईव्ही फक्त 60 मिनिटांच्या कालावधीत 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते. ही कार अत्यंत परवडणार्‍या किंमतीत लाँच केली जाऊ शकते.

Mahindra eKUV100

महिंद्रा ईकेयूव्ही 100 ला 2020 ऑटो एक्सपो दरम्यान लाँच केलं होतं. माहितीनुसार, यात 15.9 किलोवॅटची लिक्विड कूल मोटर देण्यात आली आहे जी 120nM टॉर्कसह 54Ps उर्जा उत्पन्न करते. 80 टक्के चार्ज करण्यासाठी फक्त 50 मिनिटे लागतात, असा दावा कंपनीने केला आहे. या एसयूव्हीची किंमत 8 ते 9 लाख रुपयांपर्यंत असू शकते.


- Advertisement -

हेही वाचा – ब्राउझिंग अधिक सुरक्षित होण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं ‘किड्स मोड’


 

- Advertisement -