घरटेक-वेकआली आली ब्लूटूथवाली स्कूटर आली

आली आली ब्लूटूथवाली स्कूटर आली

Subscribe

भारतात जितक्या स्कूटर आहेत, त्यामधील काही स्कूटर स्मार्टफोनसोबत कनेक्ट होतात. आजकाल स्मार्टफोन कनेक्टिव्हीटी एक गरजेचे फिचर झाले आहे. त्यामुळे अनेक ऑटोमोबाईल कंपनी आपल्या स्कूटर स्मार्टफोनसोबत कनेक्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हीटी हे सामान्य फिचर झाले आहे, परंतु आज आम्ही तुम्हाला अशी स्कूटर दाखवणार आहोत, ज्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हीटीचे फिचर दिले गेले आहे. जेणेकरून तुम्ही स्मार्टफोनसोबत सोप्या पद्धतीने कनेक्ट होता. जाणून घ्या अशा काही स्कूटरबद्दल….

TVS NTorq 125

- Advertisement -

टीवीएस एनटार्क १२५मध्ये 124.8cc, थ्री-वॉल्व, एअर-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड इंजिन दिले गेले आहे. जे 7,000rpmवर 9.1bhp एवढी पॉवर आणि 5,500rpmवर 10.5Nm चे पीक टॉर्क जेनरेट करते. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, एनटार्क १२५ स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिड स्पीडोमीटर, फूल डिजिटल कंसोल, मल्टी मोड डिस्प्ले-स्ट्रीट, स्पोर्ट्स आणि राइड स्टेट्स बेस्ट लॅप आणि लास्ट लॅप, पर्सनल वेलकम मॅसेजिस, इनकमिंग कॉल अलर्ट, इनकमिंग मॅसेज अलर्ट, मिस्ड कॉल अलर्ट, नॅविगेशन असिस्ट, इंजिन टेंप्रेचर इंडिकेटर, फोन सिग्नल स्ट्रेंथ डिस्प्ले, फोन बॅटरी स्ट्रेंथ डिस्प्ले, ऑटो सिंग क्लॉक, लास्ट पार्क्ड लोकेशन असिस्ट, ट्रिप रिपोर्ट जनरेशन, ऑटो रिप्लाइ एसएमएस आणि एक्सक्लुसिव्ह रायडर्स अॅपसारखे फिचर्स दिले गेले आहेत.

  • किंमत – ७१,०९५ रुपये (एक्स-शोरुम)

Suzuki Access 125

- Advertisement -

Suzuki Access 125 च्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये कंपनीने BS6 कंप्लाइंट 124ccचे 4-स्ट्रोक, सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड, २-वाल्व SOHC इंजिन दिले गेले आहे. हे इंजिन 6750rpmवर 8.6 Bhp मॅक्झिमम पॉवर आणि 5500rpmवर 10 Nmचे पीक टॉर्क जेनरेट करण्यात पूर्णपणे सक्षम आहे. हे इंजिन CVTसोबत येते. Suzuki Access 125 BS6च्या फ्रंटमध्ये डिस्ट ब्रेक दिला गेला आहे. तर याच्या रियरमध्ये ड्रम ब्रेक दिला गेला आहे. फिचर्स बघायला गेले तर, याच्या फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि रिअरमध्ये स्विंग आर्म सस्पेंशन ऑफर केला जात आहे.

  • किंमत – ७१,००० रुपये (एक्स-शोरुम)
Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -