स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्स

अनेकदा रात्री झोपताना आपण स्मार्टफोन चार्जिंगला लावतो आणि रात्रभर फोन चार्ज होत राहतो. रात्रभर फोनला चार्जिंगला ठेवणे धोकादायक आहे.

Smart Phone

* फोन चार्जिंग करत असताना उशी खाली किंवा कोणत्याही वस्तूखाली ठेऊ नका. यामुळे फोन ओव्हर हिट होतो व स्फोट होण्याची भीती असते.

चार्जिंग करताना फोनवर गेम्स किंवा व्हिडिओ बघणे टाळा. यामुळे फोनचे तापमान वाढते आणि त्यामुळे स्फोट होऊ शकतो.

चार्जिंग करताना हेडफोन्सने गाणे ऐकणे धोक्याचे आहे.

चार्जिंग सुरू असताना फोन मुलांच्या हाती देणे धोकादायक असते.

चार्जिंगला फोन लावला असताना फोन उचलू नका किंवा फोन करुही नका. फोनवर बोलायचे असेल तर अगोदर फोनची चार्जिंग बंद करा.

* सुर्याच्या प्रकाशात चार्जिंग करणे टाळा. फोनचे तापमान ० ते ४५ डिग्री यामध्ये असणे गरजेचे आहे.