घरटेक-वेकTwitter New Policy : Twitter मध्ये मोठा बदल; युजर्सचे पर्सनल फोटो, व्हिडिओ,...

Twitter New Policy : Twitter मध्ये मोठा बदल; युजर्सचे पर्सनल फोटो, व्हिडिओ, माहिती शेअर करण्यास बंदी

Subscribe

पराग अग्रवाल ट्विटरच्या सीईओ पदावर येताच ते अॅक्शन मोडमध्ये आलेत.  ट्विटरने आपल्या सुरक्षा धोरणात एक महत्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे युजर्सला कोणत्याही युजर्सची माहिती परस्पर ट्वीटरवर आत्ता शेअर करण्यापूर्वी आत्ता १० वेळा विचार करावा लागणार आहे. कारण ट्विटर युजर्सला दुसऱ्या युजर्सची वैयक्तिक माहिती, फोटो, व्हिडिओ त्या युजर्सच्या समंतीशिवाय अपलोड करता येणार नाही.  ट्विटरने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून कंपनीच्या सुरक्षा धोरणाचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. यात वैयक्तिक व्हिडिओ, फोटो, माहिती असा अनेक गोष्टींचा समावेश केला आहे.

यापूर्वी युजर्स कोणत्याही परवानगीशिवाय दुसऱ्या युजर्सचा वैयक्तिक व्हिडिओ, फोटो शेअर करत येत होता. मात्र समाजात द्वेष आणि अनेक वाईट गोष्टी पसरवण्यापासून थांबवणे आणि महिला युजर्सची प्रायव्हसी सुरक्षित करण्याच्या उद्देशाने ट्विटरने फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगवर बंधने आणली आहेत.

- Advertisement -

पर्सनल फोटो, व्हिडिओ शेअरिंगवर बंदी

ट्विटरने सांगितले की, कोणत्याही युजर्सने दुसऱ्या युजर्सचे पर्सनल फोटो, व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर करणं हे प्रायव्हसीचा भंग मानले जाते. यामुळे युजर्सचे भावनात्मक आणि शारीरिक नुकसान होऊ शकते. ट्विटरने यापूर्वीच दुसऱ्या युजर्सची वैयक्तिक माहिती, पत्ता, अधिकृत कागदपत्रे, मोबाईल नंबर किंवा अन्य माहिती, बँकिंग संबंधीत माहिती आणि इतर महत्वाची खासगी माहिती शेअर करण्यावर निर्बंध आणली आहेत.

- Advertisement -

का लागू करण्यात आला नवा नियम?

कंपनीने सांगितले की, पर्सनल मीडियाच्या दुरुपयोगामुळे अनेकांचे नुकसान होऊ शकते. तसेच महिला आणि अल्पसंख्यांक किंवा असंतुष्ट समुदायातील युजर्सवर याचा सर्वाधिक प्रभाव जाणून शकतो. याचा अर्थ असा नाही की, संबंधीत युजर्सचा फोटो, व्हिडिओ किंवा माहिती ट्विटरवर पोस्ट करण्यापूर्वी त्याची परवानगी घ्यावी लागेल. पण जर त्या युजर्सने किंवा व्यक्तीने तो फोटो, व्हिडिओ ट्विटरवरून हटवण्याची मागणी केली तर ट्वीटर त्या फोटो, व्हिडिओ अथवा माहितीवर निर्बंध लादू शकते.


भिवंडीतून ४० बांग्लादेशी घुसखोरांना अटक; बनावट पासपोर्ट, आधारकार्डसह ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -