घरटेक-वेकट्विटर पुन्हा एकदा ‘जुन्या’ रुपात!

ट्विटर पुन्हा एकदा ‘जुन्या’ रुपात!

Subscribe

ट्वीटरने पुन्हा पूर्वीप्रमाणेच टाईमलाईनवरील ट्वीटरची रचना ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे सर्वात नव्याने अपलोड होणारी ट्वीट पूर्वीसारखीच टाईमलाईनवर सर्वात वर दिसतील आणि त्याखालोखाल कालानुक्रमे पडलेली ट्वीट्स दिसतील

‘ट्वीटर’ हे नेटिझन्सचे एक आवडते सोशल मीडिया साधन आहे. जगभरातील करोडो लोक नियमितपणे ट्वीटरचा वापर करतात. दरम्यान ट्विटटरने पुन्हा एकदा आपल्या युजर्सची टाईमलाईन बदलण्याची घोषणा केली आहे.

फेसबुक किंवा ट्वीटरसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवरील ‘टाईमलाईन’ हा भाग युजर्ससाठी आणि पर्यायाने त्या सोशल साईटसाठी अत्यंत महत्वाचा असतो. कोणताही युजर त्याच्या टाईमलाईनवर काय पाहू शकतो किंवा काय पोस्ट करु शकतो, हे सर्व विशिष्ट संगणकीय अल्गोरिदमद्वारे ठरवले जाते. या अलगोरिदममध्ये सोशल साईट्स वेळोवेळी आवश्यक ते बदलदेखील करत असतात. त्यामुळे ते विशिष्ट अ‍ॅप अपडेट केल्यानंतर आपल्याला अनेकदा आपल्या ‘टाईमलाईन’मध्ये बदल झालेला दिसून येतो. अशाचप्रकारचा टाईमलाईनमध्ये एक नवीन बदल करण्याचा निर्णय ट्वीटरने घेतला आहे. हा बदल नेमका काय असणार आहे? याची माहिती सर्वच ट्वीटर युजर्सना असणं खूप महत्वाचं आहे.

- Advertisement -

का होणार बदल?

सुरुवातीपासून ट्वीटरच्या टाईमलाईनवर रिव्हर्स क्रोनोलॉजीकल ऑर्डनुसार Tweet दिसायची. म्हणजेच लेटेस्ट अर्थात सर्वात ताजे ट्वीट टाईमलाईनवर सगळ्यात वरती दिसायचे, तर त्याआधी पडलेली ट्वीट्स क्रमाक्रमाने त्या खाली दिसायची. मात्र, मध्यंतरी ट्वीटरने यामध्ये बदल करत युजरला त्याच्या आवडी-निवडीनुसार आणि त्याला महत्वाचे वाटणारे ट्वीट टाईमलाईनवर सर्वात वर ठेवण्याची मुभा दिली होती. मात्र, या बदलामुळे जगभरातील काही युजर्सनी नाराजी व्यक्त केली होती. याचाच गंभीरतेने विचार करत आता ट्वीटरने पुन्हा एकदा टाईमलाईनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे नवा बदल?

टाईमलाईनच्या सेटिंगमध्ये ट्वीटर करणार असलेला हा नवा बदल खरं तर जुनाच बदल म्हणावा लागेल. कारण ट्वीटरने पुन्हा पूर्वीप्रमाणेच टाईमलाईनवरील ट्वीटरची रचना ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे सर्वात नव्याने अपलोड होणारी ट्वीट पूर्वीसारखीच टाईमलाईनवर सर्वात वर दिसतील आणि त्याखालोखाल कालानुक्रमे पडलेली ट्वीट्स दिसतील. यामुळे त्या-त्या वेळेला महत्वाची असणारी ट्वीट्स युजर्सच्या टाईमलाईनवर सर्वात वरती दिसतील. ज्याद्वारे ट्वीटर युजर्सना प्रत्येक क्षणाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स योग्य वेळेत मिळण्यास मदत होईल. जगभरातील सुमारे ३३ कोटी ट्वीटर युजर्सना याचा फायदा होईल, असं ट्वीटरच्या अधिकार्‍यांचं म्हणणं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -