घरटेक-वेकट्विटरवरुन हद्दपार होणार लाईक बटण

ट्विटरवरुन हद्दपार होणार लाईक बटण

Subscribe

तुम्ही ट्विटरवर सक्रिय असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आपल्या टाईमलाईनवर काय असावे आणि काय असून नये? हे ठरवण्याचा आपल्याला अधिकार असतो. ट्विटरवर आपण कधी कधी दुसऱ्यांचे ट्विट रिट्विट करतो तर टाईमलाईनवर नको असणारे ट्विट आपण लाईक करतो. मात्र हृदयाच्या आकाराचे हे सुंदर लाईक बटण आता ट्विटरवरून नाहीसे होणार आहे. ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी याबद्दल वक्तव्य केले आहे. मला लाईक बटण कधी आवडले नाही, त्यामुळे आम्ही लवकरच ते काढून टाकणार आहोत, अशी घोषणाची त्यांनी केली आहे.

टेलिग्राफने दिलेल्या माहितीनुसार ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साईटने सांगितले की लाईक बटण काढून टाकण्यासंबंधी लवकरच विचार करत आहे. टेलिग्राफने केलेल्या बातमीच्या ट्विटला उत्तर देताना ट्विटर कम्युनिकेशनने सांगितले की, “आम्ही आमच्या सेवांबद्दल पुर्नविचार करत आहोत. निरोगी संभाषणाला प्रोत्साहन देण्याचा आमचा हेतू आहेत. ज्यामध्ये लाईक बटणही येते. आम्ही बदल करण्याच्या प्राथमिक स्तरावर आहोत, त्यामुळे आत्ताच काही आम्ही सांगू शकत नाहीत.”

- Advertisement -

ट्विटरने लाईक बटण २०१५ साली लाँच केले होते. त्याआधी असलेले फेव्हरट बटण काढून लाईक आणले गेले होते. ट्विटरचे कम्युनिकेशनचे उपाध्यक्ष ब्रँडन बोर्रमनसुद्धा म्हणाले आहेत, की लाईक बटण लवकर निघणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -