घरटेक-वेकTwitter वर आता शिवीगाळ करणं पडेल महागात, ७ दिवसांत अकाऊंट होईल ब्लॉक

Twitter वर आता शिवीगाळ करणं पडेल महागात, ७ दिवसांत अकाऊंट होईल ब्लॉक

Subscribe

Twitter वर शिवीगाळ करणं आता युजर्सला महागात पडणार आहे. त्यामुळे तुम्हीही ट्वीरटच्या माध्यमातून शिवीगाळ करत असला तर आत्ताच थांबा. कारण Twitter कडून आता नव्या सेफ्टी मोड ((Safety Mode) या फिचर्सचे टेस्टिंग सुरु आहे. ज्यामाध्यमातून चुकीच्या भाषेत किंवा अपशब्दांचा वापर करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल.

तसेच शिवीगाळ आणि चुकीच्या भाषेत बोलताना दोषी आढळणाऱ्या युजर्सचे अकाऊंट ७ दिवसांपर्यंत सस्पेंड केले जाईल. Twitter वर शिवीगाळ आणि अर्वाच्च भाषेचा वापर करत ट्रोलिंग करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे ट्विटरलाही अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. याच समस्येतून मार्ग काढण्यासाठी ट्विटरने हे नवे फिचर लाँच केले आहे.

- Advertisement -

Twitter वर शिवीगाळ करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई

मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Twitter ने म्हटले की, चुकीच्या शब्दांचा वापर करत बोलणाऱ्या आणि हेटफूल रिमार्क करणाऱ्यांविरोधात कडक कारावाई केली जाईल. Twitter चे नवे सेफ्टी फिचर आयओएस (iOS) आणि अॅन्ड्रॉइड या दोन्ही युजर्ससच्या छोट्या समूहासाठी रोलाआउट केले आहे. मात्र हे नवे सेफ्टी फिचर केवळ इंग्रजी भाषेत उपलब्ध असेल. Twitter ने आपल्या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून या नव्या फिचर्सची घोषणा केली.

ट्विटरवर अर्वाच्च भाषेत बोलल्यास सुरुवातीला ७ दिवस अकाउंट ब्लॉक होणार आहे, तसेच शिवीगाळ करणाऱ्यांना नोटीस पाठवली जाईल. हे फिचर सेटिंगमध्ये जाऊन टर्न ऑन कराव लागेल. त्यानंतर ट्विटरची सिस्टिम निगेटिव्ह इंगेजमेंटवर नजर ठेवणार आहे. ट्विटरवरील कंटेट आणि ट्विट करणारा युजर्ससह त्यावर रिप्लाय करणाऱ्यावर ही लक्ष असणार आहे.

- Advertisement -

कंपनीने असे म्हटले आहे की, जर तुम्ही एखादे अकाउंट फॉलो केले असेल आणि त्याच्यासोबत तुम्ही दररोज बोलत असाल तर कंपनी असे अकाउंट ऑटो ब्लॉक करणार नाही आहे. चुकीच्या भाषेत ट्विट करणाऱ्या युजर्सची ओळख पटवली जाणार आहे. तसेच त्याला ऑटो ब्लॉक केल्यास कोणालाही त्याला फॉलो करता येणार नाही आहे. त्याचसोबत डायरेक्ट मेसेज ही पाठवता येणार नाही.


Coronavirus : कोरोनाच्या नव्या C.1.2 व्हेरियंटचा धोका; परदेशातून येणाऱ्यांसाठी ‘हे’ आहेत नवे नियम


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -