घरटेक-वेकTwitter चं नवं फीचर लाँच; व्हॉईस मॅसेजसह व्हॉईस ट्विट करता येणार

Twitter चं नवं फीचर लाँच; व्हॉईस मॅसेजसह व्हॉईस ट्विट करता येणार

Subscribe

जाणून घ्या, डीएममध्‍ये वॉईस मेसेज कसा पाठवावा

सोशल मीडियावर सर्वाधिक युजर्स हे ट्विटरवर अॅक्टिव्ह असतात. मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म अर्थात ट्विटर देशात अनेकाचे महत्त्वाचे साधन बनले आहेत. राजकीय नेते, खेळाडू आणि कलाकार मंडळी देखील ट्विटरचा सर्वाधिक वापर करताना दिसतात. या ट्विटर युजर्ससाठी चांगली बातमी म्हणजे आता ट्विटरवर टेक्स्ट मॅसेजेस वारंवार टाईप करण्यापासून सुटका होणार आहे. कारण भारतातील युजर्ससाठी डायरेक्ट मेसेजमध्ये व्हाइस मेसेजचे नवे फीचर आणले आहे.

भारतातील युजर्संना या फीचर्सचा लाभ घेता येणार आहे तर ट्विटर कंपनीने या फीचरला सध्या केवळ तीन देशात आणले आहे. ब्राझील आणि जपानसोबत भारताचा डायरेक्‍ट मेसेजेस् (डीएम) प्रयोगामध्‍ये वॉईस मेसेजेस् मिळणा-या पहिल्‍या तीन देशांमध्‍ये समावेश असून भारत, जपान आणि ब्राझीलमध्ये ही सेवा लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. डीएममधील वॉईस मेसेजेस् लोकांना सुलभपणे संवाद साधण्‍याची सुविधा देणार आहेत. हा प्रयोग भारतीयांसाठी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने करण्‍यात येणार असल्याचीही माहिती मिळतेय.

- Advertisement -

ट्विटर हे असे गंतव्‍य आहे, जेथे लोक त्‍यांच्‍यासाठी महत्त्वाच्‍या असलेल्‍या गोष्‍टींचा शोध घेतात, त्‍यांना फॉलो करतात आणि त्‍याबाबत चर्चा करतात. लोकांना सुलभपणे संवाद करण्‍याची सुविधा देण्‍यासाठी ट्विटर डायरेक्‍ट मेसेजेसमधील (डीएम) वॉईस मेसेजेस् किंवा भारतातील वॉईस मेसेजेसची चाचणी करत आहे. हा प्रयोग भारतीयांसाठी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने करण्‍यात येणार आहे. यामुळे ब्राझील व जपानसोबत ही सुविधा असणारा भारत हा पहिल्‍या तीन देशांपैकी एक आहे. ट्विटर इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक मनिष महेश्‍वरी म्‍हणाले, ”भारत ही ट्विटरसाठी प्राधान्‍य बाजारपेठ आहे. यामुळेच आम्‍ही सातत्‍याने नवीन वैशिष्‍ट्यांची चाचणी घेत आहोत आणि सेवेवरील लोकांच्‍या अनुभवांमधून माहिती मिळवत आहोत. आम्‍ही देशात डीएम प्रयोगामध्‍ये वॉईस मेसेजेस् सुविधा आणण्‍यासाठी आणि लोकांना अभिव्‍यक्‍त करण्‍याचा नवीन मार्ग देत एखाद्या व्‍यक्‍तीचा आवाज ऐकत बारकावे, भावना व सहानुभूतीच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍याशी संलग्‍न होण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी उत्‍सुक आहोत.”

प्रत्‍येक वॉईस मेसेज जवळपास १४० सेकंदांचा असू शकतो आणि चालता-फिरता किंवा अधिक प्रमाणात मेसेज टाइप करण्‍याची गरज असताना जलदपणे चॅटिंग करण्‍यामध्‍ये मदत करू शकतो. टेक्‍स्‍ट मेसेजच्‍या माध्‍यमातून अनेक गोष्‍टी सांगण्‍याच्‍या राहू शकतात किंवा त्‍यामध्‍ये अडथळा येऊ शकतो. म्‍हणून वॉईस मेसेजसह ट्विटरची श्रोते व कथाकारांसाठी अधिक मानवी अनुभव निर्माण करण्‍याची इच्‍छा आहे.

- Advertisement -

ट्विटर येथील डायरेक्‍ट मेसेजेससाठी प्रॉडक्‍ट मॅनेजर अॅलेक्‍स अॅकरमन-ग्रीनबर्ग म्‍हणाले, ”आम्‍ही लोकांना सार्वजनिकरित्‍या व खाजगीरित्‍या ट्विटरवरील संवादांमध्‍ये अभिव्‍यक्‍त करण्‍याचे अधिक पर्याय देण्‍याशी समर्पित आहोत. आम्‍ही आशा करतो की, लोकांना डीएमच्‍या माध्‍यमातून वॉईस मेसेजेस् रेकॉर्ड करण्‍यासोबत पाठवण्‍याची सुविधा दिल्‍याने अधिक सोयीसुविधा व अभिव्‍यक्‍त करण्‍याची सेवा मिळत त्‍यांच्‍या संवादात्‍मक अनुभवामध्‍ये वाढ होईल.”

डीएममध्‍ये वॉईस मेसेज कसा पाठवावा?

• हँड्स-फ्री अनुभवासाठी डीएम संवादामध्‍ये रेकॉर्डिंगला सुरूवात करण्‍याकरिता एकदाच नवीन वॉईस रेकॉर्डिंग आयकॉनवर टॅप करा.

  • मेसेज बोलून झाल्‍यानंतर स्‍टॉप आयकॉनवर टॅप करा आणि तुम्‍हाला मेसेज पाठवण्‍यापूर्वी किंवा डिलिट करण्‍यापूर्वी रेकॉर्ड केलेला संदेश ऐकण्‍याचा पर्याय उपलब्‍ध होईल.

• आयओएसवर तुम्‍ही वॉईस रेकॉर्डिंग आयकॉन धरून राहत जलदपणे मेसेज पाठवू शकता आणि बोलून झाल्‍यानंतर त्‍वरित संदेश पाठवण्‍यासाठी स्‍वाइप अप करू शकता.

  • कोणीही ट्विटरचा वापर केल्‍यानंतर हे संदेश कुठेही ऐकू शकतील. पण, डीएमवर वॉईस मेसेजेस् रेकॉर्ड करण्‍याची सुविधा फक्‍त भारत, जपान व ब्राझीलमधील आयओएस व अँड्रॉईडचा वापर करणा-या लोकांसाठी ट्विटरवर उपलब्‍ध असेल.

 

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -