घरटेक-वेकtwitterने पुन्हा सुरु केलं पब्लिक वेरिफिकेशन, Blue Tick वेरिफिकेशनच्या सोप्या स्टेप्स

twitterने पुन्हा सुरु केलं पब्लिक वेरिफिकेशन, Blue Tick वेरिफिकेशनच्या सोप्या स्टेप्स

Subscribe

ट्विटर अकाउंट गेल्या सहा महिन्यांपासू अँक्टिव्ह असणे महत्त्वाचे

ट्विटरवर Blue Tick असणे हे खूप महत्त्वाचे समजले जाते. अनेक सेलिब्रेटी,युझर्स त्यांच्या प्रोझाइलवर ब्लू टिक येण्यासाठी वाट पाहत असतात. ट्विटरने नोव्हेंबर २०१७ पासून पब्लिक वेरिफिकेशन बंद केले होते. परंतु ट्विटरने पुन्हा एकदा पब्लिक वेरिफिकेशनसाठी सुरु केल्याची महत्वाची घोषणा केली आहे. आतापर्यंत ट्विटर स्वत: किंवा कंपन्यांच्या रिक्वेस्ट आल्यानंतर त्यांचे अकाउंट वेरिफाय करत होते. पण आता पुन्हा एकदा युझर्स आपल्या अकाऊंटवर blue Tickसाठी अप्लाय करु शकता. मात्र त्यासाठी ट्विटरने काही अटीही दिल्या आहेत. काय आहेत त्या अटी? जाणून घ्या Blue Tick वेरिफिकेशनच्या सोप्या स्टेप्स (twitter Start public Account verification, simple steps of blue tick verification)

याआधी blue Tick साठी ट्विटरला अर्ज करावा लागत होता. यावेळी मात्र ट्विटरने प्रत्येक युझर्सच्या प्रोफाइल सेंटिग्समध्ये वेरिफिकेशनचा पर्याय दिला आहे. थोड्या दिवसांनी हा पर्याय युझर्सना दिसेल. काहींना दिसणे सुरुही झाले असले. यावेळी ट्विटरने युझर्सच्या पात्रतेतही बदल केले आहेत.

- Advertisement -
  • वेरिफिकेशनसाठी ब्लू टिकसाठी अर्ज करण्याआधी अकाउंट कंप्लिट असणे गरजेचे आहे.
  • प्रोफाइल फोटो,नाव,ईमेल आयडी,फोन नंबर वेरिफाइड असणे गरजेचे आहे.
  • अकाउंट गेल्या सहा महिन्यांपासू अँक्टिव्ह असणे महत्त्वाचे आहे.
  • ट्विटरवरुन ट्विटरच्या नियमांचे उल्लघन झालेले नसावे.
  • वेरिफिकेशनसाठी सरकारकडून देण्यात आलेला आयडी,ईमेल आयडी,ऑफिशिअल वेबसाईट द्यावी लागणार आहे.

काही दिवसांनी ट्विट अकाउंटच्या सेटिंग्जमध्ये Verification Application हा पर्याय तुम्हाला दिसेल. त्या लिंक वर जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. ब्लू टिकसाठी एकदा अप्लाय केल्यानंतर काही दिवसांनी ट्विटर मेल करुन तुम्हाला रिप्लाय देईल. अकाउंट वेरिफाय झाल्यास तुमच्या प्रोफाइलवर ब्लू टिक दिसेल. वेरिफाय नाही झाल्यास ३० दिवसांनी तुम्ही पुन्हा वेरिफिकेशनसाठी अप्लाय करु शकता.


हेही वाचा – Bajaj Auto:ग्राहकांसाठी खुशखबर! आता ३१ जुलै पर्यंत घेऊ शकता फ्री सर्व्हिसचा आनंद

- Advertisement -

 

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -