Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक दहा हजार फॉलोअर्स असणाऱ्या युझर्ससाठी Twitter लाँच करणार सुपर फॉलोअर्स टूल

दहा हजार फॉलोअर्स असणाऱ्या युझर्ससाठी Twitter लाँच करणार सुपर फॉलोअर्स टूल

फिचरचा उपयोग सेलिब्रेंटीज,लेखक, पत्रकार असणाऱ्या युझर्ससाठी होणार

Related Story

- Advertisement -

ट्विटर गेल्या काही दिवसांपासून नवीन सर्व्हिस, फिचर्स लाँच करण्याची घोषणा करत आहे. लवकरच ट्विटर युझर्ससाठी एक नवीन फिचर लाँच करणार आहे. ज्याचे नाव आहे Twitter Super Followers. या फिचरच्या अंतर्गत यूझर्स आपल्या फॉलोअर्सकडून अतिरिक्त कॉन्टेंटसाठी शुल्क आकारु शकते. सुपर फॉलोअर्स टूल हे फिचर केवळ ट्विटवर १० हजारांपेक्षा अधिक फॉलोअर्स असणाऱ्या ट्विटर युझर्ससाठी असणार आहे. (Twitter will launch Super Followers tool for users with 10K followers)  मात्र त्यासाठी मागील ३० दिवसात कमीतकमी २५ पोस्ट केलेल्या असणे आवश्यक असणार आहे. या फिचरचा उपयोग सेलिब्रेंटीज,लेखक, पत्रकार असणाऱ्या युझर्ससाठी होणार आहे. रिव्हर्स इंजिनिअर Jane Manchun Wong यांनी काही स्क्रिनशॉट्स शेअर केले आहेत त्यात हे फिचर कसे काम करते याची माहिती देण्यात आली आहे.

Jane Manchun Wong यांनी शेअर केलेल्या स्क्रिनशॉर्टमध्ये एक लिस्ट शेअर केली आहे. त्यात सुपर फॉलो युझर्स आपली आवडीची कॅटेगरी निवडू शकतात. सुपर फॉलो या फिचरसाठी सबस्क्रिप्शन मेंबरशीप फॉलोअर्सना घ्यावी लागणार आहे. अतिरिक्त व खास पोस्ट पाहण्यासाठी फॉलोअर्सला एका महिन्याला जवळपास ४.९९ डॉलर म्हणजेच ३६३ रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागणार आहेत.

- Advertisement -


सुपर फॉलोअर्स टूल हे फिचर वापरण्यासाठी युझर्सकडे १० हजार फॉलोअर्स असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मागील ३० दिवसात किमान २५ पोस्ट केलेल्या असणे गरजेचे आहे आणि मुख्य म्हणजे युझर्सचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.

ट्विटरने गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासाठी ट्विटर ब्लू नावाचे फिचर्स आणले आहे. ट्विटर पोस्ट केलेली कोणतीही पोस्ट ३० सेकंदाच्या आता डिलीट किंवा एडीट करण्याचा पर्याय त्यात दिला आहे. त्याचप्रमाणे टाइमलाईनवर पोस्ट केलेले ट्विट ३० सेकंदाच्या आत अनडू देखील करता येणार आहे. आता भारतातील युझर्सही ही सर्व्हिस वापरु शकणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा – तुमचा स्मार्टफोन कोणत्या Appमुळे होतोय स्लो, कसे घ्यायचे जाणून?

 

- Advertisement -