घरटेक-वेकTwitter मध्ये वापरा फेसबुकचे फीचर, काय आहेत हे नवे बदल? वाचा...

Twitter मध्ये वापरा फेसबुकचे फीचर, काय आहेत हे नवे बदल? वाचा सविस्तर

Subscribe

कंपनी आपल्या ट्विटर प्लॅटफॉर्म वर फेसबुक सारखे रिअॅक्शन फीचर सुद्धा जोडणार आहे.

मॅक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर (Twitter) तर्फे  नुकतच  ब्लू टिक वेरिफिकेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. तसेच कंपनी आपल्या ट्विटर प्लॅटफॉर्म वर फेसबुक सारखे रिअॅक्शन फीचर सुद्धा जोडणार आहे. या नव्या फीचरमध्ये ‘हाहा,हम्मम,निराशा’ सारख्या एमोजी समाविष्ट करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अॅनालिस्ट जेन मनचुन वोंग  यांचा दावा आहे की युजर्सना ट्विटरवर लाइक बटन मिळणार आहे. या नव्या फीचर्समुळे ट्विटर युजर्सचा अनुभव आणखी सुलभ आणि चांगला होणार आहे असे कंपनीतर्फे बोलण्यात येत आहे अशी माहिती 9 टू 5 मॅक रिपोर्टतर्फे देण्यात आली आहे.
ट्विटर सध्या रिअॅक्शन फीचरची पडताळणी करत आहे. लवकरच हे नवे फीचर्स युजर्सना वापरण्याची परवानगी देण्यात येईल ट्विटर सेटिंगमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. सध्या ट्विटर तर्फे या नव्या रिअॅक्शन फीचर बद्दल  अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आली नाहीये.

ब्लू टिक वेरिफिकेशन  प्रक्रिया  

मे महिन्यात ट्विटरने ब्लू टिक वेरिफिकेशन प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. युजर्स आपले अकाऊंट वेरीफिकेशन करण्यासाठी अर्ज पाठवू शकतात. ट्विटर तर्फे सांगण्यात येत आहे की फक्त सहा प्रकारच्या युजर्स अकाऊंटला ब्लू टिक वेरिफिकेशन देण्यात येणार आहे यात सरकार, कंपनी-ब्रॅंड, स्पोर्ट-गेमिंग, एंटरटेनमेंट, पत्रकार,ऑग्रनाइजर-प्रभावशाली लोकांचा समावेश असणार आहे.

- Advertisement -
ट्विटरवर  ब्लू टिक वेरिफिकेशनसाठी कसं करणार अर्ज ?

ट्विटरवर तुमचे खरे नाव युजर्सनेम मध्ये अॅड करावे.हे नियम कंपनीसाठी सुद्धा लागू होतात.

वेरिफाईड मोबाईल नंबर,कन्फर्म मेल आयडी,व्यक्ती किंवा कंपनीच्या ब्रॅंड बद्दल योग्य  माहिती देण्यात यावी

- Advertisement -

कंपनी,ब्रॅंड,अकाऊंट युजर यांचा फोटो द्यावा लगेले.

जर अकाऊंट व्यक्तीगत असेल तर जन्म त्तरखेची नोंद करावी लागेल.

ट्विटरच्या सेटिंग मध्ये प्रायव्हसी सेटिंग मध्ये पब्लिक ट्विट सेट असायला हवं.

verification.twitter.com साईटवर जाऊन तुम्ही असे काय काम करतात त्यासाठी तुमचे अकाऊंट वेरिफाईड करण्यात यावे. याची संपूर्ण माहिती लिहावी.

कोणत्याही सरकारी ओळखत्राचे कागदं  स्कॅन करून सबमिट करण्यात यावे.

या सर्व प्रक्रियेनंतर ट्विटर तुम्हाला एक मेल पाठवून तुमचे अकाऊंट वेरिफाईड झाले आहे की नाही याची संपूर्ण माहिती देणार.  जर तुमचे अकाऊंट वेरिफाईड नसेल झाले तर पुन्हा 30 दिवसांनी तुम्ही वरील प्रक्रिया फॉलो करून वेरीफिकेशन साठी अर्ज पाठवू शकतात.


हे हि वाचा – यूएईचा Golden Visa म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -