घरटेक-वेकValentines Dayला काय बरं देणार गिफ्ट?

Valentines Dayला काय बरं देणार गिफ्ट?

Subscribe

यावर्षी आपल्या प्रिय व्यक्तीला ही द्या गरजेची आणि आवश्यक गिफ्टस.

प्रेमाचा महिना म्हणजे ‘फेब्रुवारी’. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच Valentines वीकला सुरुवात होते. सर्वच प्रेमीयुगुले या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण हा महिना प्रेम व्यक्त करणारा महिना म्हणून ओळखला जातो. तसेच या महिन्यांत प्रेमीयुगुलांची वेगळीच धमाल असते. कारण त्यांना आपल्या प्रियकराकडून किंवा प्रेयसीकडून छान छान गिफ्ट देखील मिळतात. पण, नेमके काय गिफ्ट घ्यावे, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. पण, काळजी करु नका कारण आज आम्ही तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला काय गिफ्ट घ्याल ते सुचवणार आहोत.

परफ्युम्स

परफ्युम्स कोणाला नाही आवडत. सर्वांनाच परफ्युम्स आवडतात. विशेष म्हणजे प्रेम व्यक्त करण्यासाठी परफ्युम्स एक चांगल गिफ्ट आहे. स्पायकर, गुची, निव्हिया असे अनेक पर्याय बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी आपल्या प्रियकराच्या आवडीप्रमाणे एखादा सेट गिफ्ट करावा. मात्र, त्यांना कोणत्या सुवासाची आवड आहे, हेदेखील गिफ्ट खरेदी करताना लक्षात घेणं आवश्यक आहे.

- Advertisement -

जुन्या फोटोंची फ्रेम

बऱ्याचदा रिलेशन्शिपमध्ये असल्यावर आपण बरेच फोटो काढतो. तर काही फोटो हे फार जुने असतात. पण, रोजच्या घाईगडबडीच्या धावपळीत आपण ते पाहतच नाही. अशावेळी जर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला जुन्या फोटोंची फ्रेम दिली तर ती फ्रेम च्या प्रिय व्यक्तीला खूपच आवडेल.

- Advertisement -

गिफ्ट व्हाऊचर

गिफ्ट व्हाऊचर हाही एक चांगला पर्याय आहे. एखाद्या ठिकाणचं गिफ्ट व्हाऊचर देऊन त्या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता.

पत्र लिहा

सध्याच्या पिढीने पत्र लिहिल म्हटलं का हसू येईल. कारण आजकालची पिढी कोणासाठी कधी पत्र लिहितच नाही. पण, तुम्ही तुमच्या प्रियकासाठी नक्की एखाद पत्र लिहा. ते त्याला नक्की आवडेल.

बॅग

बॅग हा एक उत्तम पर्याय आहे. ऑफिस किंवा कॉलेजला जाणारी प्रत्येक व्यक्ती बॅगचा वापर करते. त्यामुळे बॅग हा एक चांगला पर्याय आहे. विशेष म्हणजे त्या बॅगचा वापरही केला जातो आणि हे गिफ्ट प्रियसीला तर खूपच आवडते.

स्मार्ट वॉच

सध्याची तरुण पिढी फिटनेससाठी स्मार्ट वॉचचा वापर करतात. त्यामुळे स्मार्ट वॉच गिफ्ट देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तसेच हे गिफ्ट प्रियकर प्रेयसीला किंवा प्रेयसी प्रियकराला देऊ शकते.


हेही वाचा – तुम्ही Airtel वापरताय का? तर सावधान! २५ लाख युजर्सचा डाटा लीक


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -