Diwali 2021: सावधान! दिवाळीत ऑनलाईन शॉपिंग करताय? शॉपिंग ऑफर्सच्या नावाखाली होतेय फसवणूक

अॅमेझॉन सारख्या मोठ्या शॉपिंग वेबासाईट कंपनीच्या  नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली जात आहे

Very Careful while online shopping

सणासुदीच्या काळात खरेदी आली. आणि सध्या ऑनलाईन शॉपिंगला सर्वाधिक महत्त्व देण्यात येत आहे.  या काळात अँमेझान,फ्लिपकार्ड, मींत्रा सारख्या अनेक शॉपिंग वेबसाईट्सवर अनेक धमाकेदार ऑफर देखील सुरू आहेत. मात्र सावधान रहा कारण सणासुदीच्या काळात काही ऑनलाईन भामटे चांगलेच सक्रीय झाले आहेत. मोठ्या ऑफर्स, कूपन कोड बाय वन गेट २ फ्री अशा अनेक ऑफर्स दिल्या जातायत आणि ऑनलाईनफ फसवणूक केली जातेय त्यामुळे ऑफर्सच्या नावाखाली अशा आमिषांना बळी न पडण्याचे आव्हान देखील सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

प्रामुख्याने अॅमेझॉन सारख्या मोठ्या शॉपिंग वेबासाईट कंपनीच्या  नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. अॅमेझॉन कंपनीचे नाव वापरुन नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेय. सध्या दसरा दिवाळी सारख्या सर्वात मोठ्या सणांचे दिवस सुरू आहेत. अशा वेळी विविध फेस्टिव्हलच्या ऑफर्सच्या नावाखाली एक लिंक पाठवली जाते. त्या लिंकवर क्लिक करताच तुमचे बँक खाते हँक होते.

त्याचप्रमाणे हल्ली स्वस्तात वस्तूंची विक्री करणाऱ्या अनेक कंपन्या तसचं वेबसाईट्स सुरू झाल्या आहेत. त्यातील काही कंपन्या खऱ्या देखील आहेत. मात्र अशा वेबसाईट्सवरुन फेसबुकच्या माध्यमातून ग्राहकांना स्वस्त वस्तूंच्या जाहीराती दाखवल्या जात आहे. खरेदी करण्याच्या उत्साहात असल्याने अनेक जण जाहीराती ओपन करतात. स्वस्तात कपडे देण्याचे आमिष दाखवले जाते आणि फसवणूक केली जात आहे.


आजकाल फोन रिचार्ज करण्यासाठी airtel Jio सारख्या कंपन्या अनेक धमाकेदार ऑफर्स देत असतात. मात्र या कंपन्यांच्या येणाऱ्या सगळ्या ad या त्याच कंपन्यांच्या असतील असं नाही. बऱ्यादा हा रिचार्च करा यावर दोन महिन्यांचे नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन फ्री त्याचप्रमाणे ६० जीबी इंटरनेट सेवा फ्री अशा अनेक ऑफर्स दिल्या जातात. त्यांची एक लिंक दिली जाते ती डॉऊनलोड करा सांगितलं जात आणि डाऊनलोड करताच नागरिकांच्या बँक अकाउंटवर डल्ला मारतात.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लकी ड्रॉमध्ये तब्बल १ लाखांपासून १० लाखांपर्यंत जिंकलले कूपन लोकांना पत्राद्वारे पाठवले जातात. आणि त्यांना एक नंबर देण्यात येतो त्यात दिलेल्या नंबर वर कॉल करायला सांगितलं जातं आणि त्यानंतर बँक खात्यात पैसे भरण्यासाठी सांगितले जाते. सायबर पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी असे कोणतेही कूपन कोड किंवा  किंवा ऑफर्स आल्या तर त्याची माहिती तात्काळ सायबर पोलिसांना द्यावी असे आवाहन केले आहे.

मागच्या ९ महिन्यात मुंबईत क्रेडीट कार्ड आणि ऑनलाईन फसवणूकीचे एकूण ४४२ गुन्हे दाखल करण्यात आलेत. यातील केवळ ३० गुन्ह्यांची उकल करण्यात सायबर पोलिसांना यश आलं आहे. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना कोणत्याही फेस्टिव्ह ऑफर्सला बळी पडू नका नाहीतर यंदा दिवाळीत तुमचंच दिवाळं निघेल.


हेही वाचा – Diwali 2021: म्हणून दिवाळीच्या रात्री खेळला जातो जुगार