घरटेक-वेकVideo:बाबो! कोरोनापासून वाचण्यासाठी खाल्ल्या चक्क आगीच्या गोळ्या,व्हिडिओ झाला व्हायरल

Video:बाबो! कोरोनापासून वाचण्यासाठी खाल्ल्या चक्क आगीच्या गोळ्या,व्हिडिओ झाला व्हायरल

Subscribe

व्हिडिओ पाहून अनेकांची झोप उडाली

देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशाची आकडेवारी ४ लाखांच्या वर गेली. कोरोनापासून वाचण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात याचा प्रत्यय आपल्याला कोरोनाच्या पहिल्या लाटेत आलाच आहे. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेक अफवा, खोटी माहिती दिली जाते. त्या आधारे लोक कोणतेही भन्नाट प्रयोग करतात. अशा अनेक व्हायरल व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिल्या असतील. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात एक महिला कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी थेट तोंडात आगीचे गोळे टाकून ते चावत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांची झोप उडाली आहे. आगीचा हा प्रयोग करुन अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ एका आयएएस अधिकाऱ्याने शेअर केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे सगळेच व्हिडिओ खरे नसतात, हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.


आयएएस अधिकारी रुपल शर्मा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला एका खुर्चीत बसली आहे. तिच्या पुढ्यात एक ताट आहे. त्यात आगीचे गोळे आहेत. ती महिला एक एक आगीचा गोळा उचलून तोंडात टाकून खात आहे. पेटते गोळे चिमट्याच्या सहाय्याने पाणी पुरी खावी तशी मटामट खात आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. या व्हिडिओ सध्या लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक कमेंट्स ही केल्या आहेत. हा कोणता नाश्ता आहे असे नेटकरी विचारत आहेत. तोंडात आगीचे गोळे टाकणारी ही महिला नक्की कोण आहे हे अद्याप समोर आलेले नाही. रुपल शर्मा यांनी केवळ सोशल मीडियाच्या सर्व गोष्टी खऱ्या नसतात हे सांगण्याचा प्रयत्न केले आहे.

- Advertisement -

आयएएस अधिकारी रुपल शर्मा यांनी हा व्हिडिओ शेअर त्या खाली असे लिहिले आहे की, ‘स्टीम घेतल्यावर, मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यावर, हळदीचे दूध प्यायल्यानंतर, रोज गरम पाणी प्यायल्यानंतर हा शेवटचा पर्याय राहिला आहे. हे करुन कोरोना जिवंतपणे भस्मसाद होईल. पण तुम्ही असे करु नका’, असे आवाहन त्यांनी केले आहे.


हेही वाचा – कॅन्सर रुग्णांनी कोरोना लस घेण्याआधी काय करावे आणि काय करु नये? जाणून घ्या

- Advertisement -

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -