घरटेक-वेकVivo ने भारतात लाँच केले ट्रू वायरलेस इयरफोन; जाणून घ्या किंमतीसह वैशिष्ट्य

Vivo ने भारतात लाँच केले ट्रू वायरलेस इयरफोन; जाणून घ्या किंमतीसह वैशिष्ट्य

Subscribe

शाओमी आणि रियलमीसह अनेक स्मार्टफोन निर्मात्यांनी नुकतेच असे इयरफोन लाँच केले आहेत

Vivo ने भारतात ट्रू वायरलेस इयरबड्स बाजारात लाँच केले आहे. आजकाल बाजारात Apple AirPods सारखे दिसणारे बरेच इयरफोन उपलब्ध आहेत. शाओमी आणि रियलमीसह अनेक स्मार्टफोन निर्मात्यांनी नुकतेच असे इयरफोन लाँच केले आहेत. Vivo TWS Neo मूनलाइट व्हाइट आणि स्टारी ब्लू या दोन रंगात लाँच करण्यात आले आहे. याची किंमत ५ हजार ९९० रुपये आहे. २४ जुलैपासून त्याची विक्री भारतात सुरू होणार आहे. भारतात या Vivo इयरफोनला शाओमी आणि रियलमी इयरफोनकडून जोरदार स्पर्धा मिळणार आहे. या इयरफोन्सचे डिझाईन वेगळे आहे, मात्र त्याचे पॅर्टन सारखेच आहे.

Vivo च्या इयरबड्समध्ये १४.२ मिमी डायनॅमिक ड्राइव्हर्स आहेत. हे ब्लूटूथ v5.2 सपोर्ट करते. कंपनीने असा दावा केला आहे की त्यात Qualcomm aptx ब्लूटूथ कोडेकचा सपोर्ट आहे. चांगल्या ऑडिओसाठी कंपनीने त्यात DeepX स्टीरिओ साउंड इफेक्ट दिला आहे.

- Advertisement -

DeepX हे vivo चे तंत्रज्ञान आहे जे कंपनी आपल्या स्मार्टफोनमध्ये प्रदान करते. कंपनीने म्हटले आहे की, त्याची बॅटरी AAC एन्कोडिंगसह ५.५ तासांचा बॅकअप देणार असून aptX कोडेकसह हे सतत ४.२ तास चालू शकते. कंपनीच्या मते, हे इयरबड्स वाटर आणि डस्ट रेजिस्टेंट आहेत तर त्यांचे IP54 रेटिंग आहे. vivo ने असा दावा केला आहे की, प्रदान केलेल्या चार्जिंग केसची बॅटरी २२ तास चालणार आहे. चार्ज करण्यासाठी USB C Type पोर्ट देण्यात आला आहे.


Vivo X50 आणि X50 Pro स्मार्टफोन भारतात लाँच
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -