Vivo V11 आणि V11 Pro होणार ६ सप्टेंबरला लाँच

रोज नवेनवे फोन भारतीय बाजारामध्ये दाखल होत असतात. यामध्येच आता सप्टेंबरमध्ये विवो कंपनी आपले दोन फोन भारतीय बाजारात दाखल करत आहे.

vivo v11
सौजन्य - युट्यूब

लवकरच भारतीय बाजारामध्ये Vivo V11 आणि V11 Pro लाँच होणार आहेत. त्यामुळं कंपनीतर्फे तुमची तारीख यासाठी ब्लॉक करा असं सांगण्यात येत आहे. पुढील महिन्याच्या ६ सप्टेंबरला हे दोन्ही फोन भारतीय बाजारामध्ये लाँच होणार आहेत. या फोनमध्ये फिंगरप्रिंट इमेज आहे. विवो ११ आता विवो ९ नंतर आता लाँच करण्यात येणार आहे. याचा एक व्हिडिओ मागील काही दिवसांपूर्वी लीक झाला होता. ज्यामध्ये या फोनच्या स्पेसिफिकेशनच्या बाबतीत माहिती देण्यात आली होती. त्याप्रमाणेच या फोनमध्ये दोन विविध फिंगरप्रिंट सेन्सर लावण्यात आले आहेत. तसंच या फोनचं डायमेन्शन 157.9x75x7.9 मिलीमीटर आहे आणि याचं वजन १५६ ग्रॅम इतकं आहे.

कसा असेल फोन?

विवो व्ही ११ चा डिस्प्ले हा ६.४१ इंच फुल एचडी असून याचं रिझोल्युशन १०८० x २३४० इतकं आहे. तर आस्पेक्ट रेशो १९.५:९ इतका आहे. यामध्ये २.२ गीगाहर्ट्झ ऑक्टा कोअर क्वांटोम स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी अंतर्गत मेमरी आहे. तर, नुकतीच १० जीबी रॅमचा फोन विवोकडून लाँच करण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली होती. तर हा फोन विवो एक्स २३ या नावानं लाँच करण्यात येईल. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी हा फोन येण्याची शक्यता आहे. तर विवो एक्स २३ हा फोन विवो एक्स २१ च्या यशानंतर लाँच करण्यात येईल असं म्हटलं जात आहे. दरम्यान या फोनमध्ये ड्युएल कॅमेरा असून प्रायमरी सेन्सर १२ मेगापिक्सल आणि सेकंडरी कॅमेरा हा ५ मेगापिक्सलचा आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा तर २५ मेगापिक्सल इतका आहे. फोनची बॅटरी ३४०० एमएएच आहे. दरम्यान या फोनमध्ये अँड्रोईड ८.१ ओरिओचा वापर करण्यात आला आहे.