घरटेक-वेकलवकरच Vivo V21e 5G होणार लाँच; जाणून घ्या याचे जबरदस्त फिचर्स

लवकरच Vivo V21e 5G होणार लाँच; जाणून घ्या याचे जबरदस्त फिचर्स

Subscribe

गेल्या आठवड्यात स्मार्टफोन कंपनी Vivoने Vivo V21e 5G भारतात लाँच करण्याची घोषणा केली होती. आता कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर Vivo V21e 5Gचे सपोर्ट पेज लाईव्ह केले आहे. यामुळे या स्मार्टफोनबाबत काही फिचर्सची माहिती मिळाली आहे. पण सपोर्ट पेजवर या स्मार्टफोनची किंमत आणि लाँचिंग तारखेबाबत माहिती दिली नाही आहे.

फिचर्स

- Advertisement -

सपोर्ट पेजवर उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, Vivo V21e 5G स्मार्टफोन 32MP सुपर नाईट सेल्फी कॅमेरासोबत लाँच होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये एक्सटेंडेबर रॅम दिला जाईल. शिवाय डिव्हाईसमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप, नॉच डिस्प्ले आणि 44W रॅपिड चार्जिंगची सुविधा मिळेल. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, Vivo V21e 5G स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचाचे एमोलेड डिस्प्लेसोबत 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिले जाईल. शिवाय स्मार्टफोनमध्ये Dimensity 700 प्रोसेसर आणि 4,000mAh बॅटरी मिळेल. या व्यतिरिक्त स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाईल. या स्मार्टफोनचे वजन १६५ ग्राम असेल.

किंमत

- Advertisement -

Vivo V21eच्या 5G मॉडेलच्या लाँचिंगबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळाली नाही आहे. परंतु लीक्सच्या माहितीनुसार, या स्मार्टफोनची किंमत २० हजार पासून ते २९ हजार रुपयांदरम्यान असेल.

काही दिवसांपूर्वी वीवोने Vivo Y73 स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला होता. या स्मार्टफोनची किंमत २० हजार ९९० रुपये आहे. Vivo Y73 स्मार्टफोनमध्ये 6.4 इंच फुल एचडी पल्स डिस्प्ले दिला गेला आहे. याचे रेजोल्यूशन 2400/1080 पिक्सल आहे. या स्मार्टफोनमध्ये आक्टा-कोर MediaTek Helio G95 प्रोसेसरचा वापर केला गेला आहे. या फोन अॅन्ड्रॉइड 11 बेस्ड FuntouchOS 11.1 काम करेल. Vivo Y73 स्मार्टफोनच्या रियर पॅनलमध्य AI ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 64MP आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -