घरटेक-वेकविवोचा दमदार कॅमेरा असलेला Vivo X60 Pro+ लाँच; जाणून घ्या किंमत

विवोचा दमदार कॅमेरा असलेला Vivo X60 Pro+ लाँच; जाणून घ्या किंमत

Subscribe

स्मार्टफोन कंपनी Vivo ने Vivo X60 Pro+ लाँच केला आहे. विवोने या नव्या फोनमध्ये दर्जेदार अशी स्पेसिफिकेशन्स दिली आहेत. फोनमध्ये पॉवरफुल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर (Qualcomm Snapdragon 888), क्वाड रियर कॅमेरा, तसंच फोटोग्राफीसाठी जीएन१ (GN1) आणि सोनी आयएमएक्स५९८ सेन्सर (Sony IMX598) देण्यात आला आहे. Vivo X60 च्या या टॉप व्हेरिएंटची ग्राहक बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. दरम्यान, आता हा फोन लाँच झाला असून या स्मार्टफोनची विक्री ३० जानेवारीपासून सुरू होणार आहे.

Vivo X60 Pro+ किंमत

Vivo X60 Pro+ कंपनीने दोन व्हेरिएंटमध्ये बाजारात आणले आहेत, ज्यामध्ये 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ५६,३९९ रुपये आणि 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ६७,६५९ रुपये आहे. विवोचा हा प्रीमियम स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एस २१ सीरिज स्मार्टफोन आणि आयफोन १२ सीरिज मोबाईलशी स्पर्धा करेल. हा मोबाइल सध्या चीनमध्ये लाँच झाला आहे. मागील महिन्यात, विवोने Vivo X60 आणि Vivo X60 Pro लाँच केले आणि आता हा सर्वात देखणा आणि पॉवरफुल स्पेसिफिकेशन असलेला मोबाइल बाजारात आणला आहे.

- Advertisement -

Vivo X60 Pro + स्पेसिफिकेशन

Vivo चा फ्लॅगशिप मोबाईल Vivo X60 Pro+ मध्ये 6.56-इंचाचा Full-HD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा स्क्रीन रेजोल्यूशन 2376×1080 पिक्सल आहे. या फोनचा डिस्प्ले रीफ्रेश रेट 120Hz आहे. हा फोन OriginOS skin आधारित Android 11 वर चालतो. या फोनमध्ये 4,200mAh बॅटरी आहे, जी 55W फास्ट वायर्ड चार्जिंग फिचर्स देण्यात आलं आहे. कंपनीचा असा दावा आहे की पूर्ण चार्ज होण्यास केवळ ४५ मिनिटे लागतात.

कॅमेरा

Vivo X60 Pro+ च्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचं झालं तर यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रायमरी सेन्सर 50MP Samsung GN1 सेंसर देण्यात आला आहे, जो कमी प्रकाशा फोटो आणि व्हिडिओ शूटसाठी चांगला आहे. यासह, 48MP Sony IMX598 सेन्सर देखील आहे. फोनमध्ये 32MP टेलिफोटो लेन्स देखील आहे. यात 5X हायब्रीड ऑप्टिकल झूमसह 8MPचा पेरिस्कोप कॅमेरा देखील आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -