Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर टेक-वेक 5000mAh बॅटरी 48 MP कॅमेरा असलेला Vivo Y72 5G स्मार्टफोन भारतात लाँच;...

5000mAh बॅटरी 48 MP कॅमेरा असलेला Vivo Y72 5G स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

Related Story

- Advertisement -

Vivo कंपनीने आपला बजेट 5G फोन Vivo Y72 5G भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 4 जीबी एक्सपेंडेबल रॅम सपोर्टसह उपलब्ध आहे. या फोनची किंमत 20 हजार 990 रुपये आहे. हा फोन ग्राहकांना प्रिझम मॅजिक आणि स्लेट ग्रे या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येणार आहे. विव्हो इंडियाचा हा फोन ई-स्टोअर, अॅमेझॉन, फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. लॉन्च ऑफरअंतर्गत HDFC बँक आणि ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सद्वारे Vivo Y72 5G फोन त्वरित 1,500 रुपयांच्या सवलतीत खरेदी करता येणार असल्याचे कंपनीकडून सांगितले जात आहे.

असे आहेत या फोनचे फीचर्स

  • स्मार्ट फोनची स्क्रिन साईज – 6.58 इंच इतकी असणार आहे.
  • स्मार्ट फोनमध्ये FHD+ डिस्प्ले वापरण्यात आला आहे.
  • स्मार्ट फोनचे रिझोल्यूशन 2400 * 1080 पिक्सल असून त्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका असणार आहे
  • या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 480 5G मोबाइल प्रोसेसर देण्यात आलेला आहे
    हा फोन युजर्सना अल्ट्रा स्लिम डिझाईनमध्ये उपलब्ध होईल
  • या फोनचे वजन 185.5 ग्रॅम असून त्याचे इनबिल्ट स्टोरेज 128 GB असणार आहे.

या फोनच्या कॅमेऱ्याची वैशिष्ट्ये

Vivo Y72 5G स्मार्टफोन ड्यूल रिअर कॅमेरा सेटअपसह युजर्सना उपलब्ध होणार आहे. याचा मुख्य कॅमेरा 48MP चा असून याशिवाय 2MP लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, सोबत 18W फास्ट चार्जर देण्यात येणार आहे. कनेक्टिव्हिटी फीचर म्हणून फोनमध्ये वाय-फाय, 2.4GHz / 5GHz, ब्लूटूथ 5.1, GPS सपोर्ट असणार आहे. फोनमध्ये इअरपीस, सी टाईप यूएसबी चार्जिंग केबल, यूएसबी पॉवर अ‍ॅडॉप्टर आणि प्रोटेक्टिव केस देखील असणार आहे.


…म्हणून Twitter ने Fleets फीचर बंद करण्याची केली घोषणा; वाचा सविस्तर

- Advertisement -