विवोचा वाय८१ बाजारात दाखल

विवोचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल झाला आहे. याची किंमत १३ हजारपर्यंत असून याची बॅटरी लाँग लास्टिंग असल्याचं सांगण्यात आलं आहे.

vivo Y81
प्रातिनिधिक फोटो

विवोने आपला अजून एक नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल केला आहे. नवा फोन विवो वाय८१ (Vivo Y81) आता ऑनलाईन स्टोअर्सवर उपलब्ध करण्यात आला आहे. या फोनचं डिझाईन हे आयफोन एक्सप्रमाणे नॉच आणि फ्रंटमध्ये बेसल लेन्स असं करण्यात आलं आहे. याशिवाय या फोनमध्ये मोठा एचडी डिस्प्ले आणि ३२६० एमएएच इतकी बॅटरी आहे. यापूर्वीदेखील विवोने बाजारामध्ये आणलेल्या फोनमध्ये विविधता होती.

Vivo Y81 ची काय आहे किंमत?

भारतीय बाजारामध्ये हा फोन दाखल झाला असून याच्या विक्रीला सुरुवात करण्यात आली आहे. या Vivo Y81 नव्या फोनची किंमत १२,९९९ रुपये इतकी आहे. तर विवोचं अधिकृत संकेतस्थळ www.vivo.com यावर अथवा अॅमेझॉनवरूनदेखील या फोनची खरेदी ग्राहकांना करता येऊ शकते. या फोनमध्ये कंपनीने गोल्ड आणि ब्लॅक हे दोन रंग उपलब्ध करून दिले आहेत. सध्या बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे फोन उपलब्ध करून दिले आहेत. तसंच काही ऑनलाईन विक्रीमध्ये एक्स्चेंज ऑफरही देण्यात आली आहे.

फोनचं स्पेसिफिकेशन

विवोच्या नव्या फोनमध्ये ड्युएल सिम स्मार्टफोन असून ८.१ ओरियोवर आधारित फनटच ओएस ४.० वर हा फोन चालतो. तर ६.२२ इंची हा फोन असून पिक्सेल ७२० x १५२० रिझोल्युशन एचडी आणि आयपीएस डिस्ल्पे आहे. फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचं प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. यामध्ये २ गीगाहर्ट्जचा ऑक्टा-कोअर मीडियाटेक एमटी६७६२ प्रोसेसर आहे. तर ३ जीबी रॅमसह ३२ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. मायक्रो एसडी कार्डद्वारे हे स्टोरेज २५६ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतं. फोनच्या कॅमेऱ्याबाबत सांगायचं झालं तर, यामध्ये एलडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. सेल्फीची आवड असणाऱ्या युजर्ससाठी ५ मेगापिक्सल कॅमेरा आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी ४ जी, एलटीई, ब्ल्यूटूथ ५.०, जीपीएस, मायक्रो-युएसबी आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक देण्यात आले आहेत.