Vodafone Idea आणि Nokia ने केलं 5G व्हॉइसचे यशस्वी प्रात्यक्षिक

व्हीओएनआर चाचणी नोकियाच्या सुविधांच्या सर्वसमावेशक पोर्टफोलिओवर करण्यात आली होती, यामध्ये एअरस्केल ५जी रॅन, ५जी कोअर आणि आयपी मल्टिमीडिया सबसिस्टिम (आयएमएस) व्हॉइस कोअर यांचा समावेश होता.

Vodafone Idea and Nokia successfully demonstrate 5G voice vonr in gandhinagar gujrat
Vodafone Idea and Nokia successfully demonstrate 5G voice vonr in gandhinagar gujrat

भारतातील आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी वोडाफोन आयडिया लिमिटेडने (‘वी’) गुजरातेतील गांधीनगरमध्ये सध्या सुरु असलेल्या ५जी चाचण्यांदरम्यान आपले तंत्रज्ञान भागीदार नोकियासोबत ५जी व्हॉइस ओव्हर न्यू रेडिओ (व्हीओएनआर) यशस्वीपणे प्रदर्शित केले आहे. तैनात करण्यात आल्यानंतर व्हीओएनआर ‘वी’ ला आपल्या सब्स्क्रायबर्सना ५जीवर हाय-डेफिनिशन व्हॉइस अनुभव प्रदान करू शकेल तसेच भविष्यात अनेक आधुनिक व्हॉइस ऍप्लिकेशन्स तसेच यूज केसेस उपलब्ध करवून देऊ शकेल. गुजरातमधील गांधीनगर आणि महाराष्ट्रातील पुणे येथे ‘वी’ सरकारने वाटप केलेल्या ५जी स्पेक्ट्रमवर ५जी चाचण्या करत आहे.

व्हीओएनआर चाचणी नोकियाच्या सुविधांच्या सर्वसमावेशक पोर्टफोलिओवर करण्यात आली होती, यामध्ये एअरस्केल ५जी रॅन, ५जी कोअर आणि आयपी मल्टिमीडिया सबसिस्टिम (आयएमएस) व्हॉइस कोअर यांचा समावेश होता. व्यापारीदृष्ट्या तैनात करण्यात आल्यानंतर ही सुविधा एका विश्वसनीय, विलंब होण्याचे प्रमाण कमी असलेल्या नेटवर्कवर युजर्सना सर्वोत्तम अनुभव प्रदान करू शकेल कारण यामध्ये व्हॉइस आणि डेटा या दोन्ही सेवांसाठी ५जी नेटवर्कचा वापर केला जाईल.

वोडाफोन आयडिया लिमिटेडचे सीटीओ श्री. जगबीर सिंग म्हणाले, “आमच्या ५जी चाचण्यांदरम्यान डिजिटल उद्योग आणि ग्राहकांना सर्वोत्तम नेटवर्क अनुभव आणि त्यांना संबंधित अशा यूज केसेस प्रस्तुत करण्यासाठी तंत्रज्ञान सुविधांच्या चाचण्या करत आहोत. देशातील सर्वात जास्त ५जी वेग प्राप्त केल्यानंतर आणि भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या यूज केसेस प्रदर्शित केल्यानंतर आता आम्ही व्हीओएनआर सेवेची देखील यशस्वीपणे चाचणी घेतली आहे जी ५जी नेटवर्क्सवर सर्वोत्तम कॉल गुणवत्ता मिळवून देते, यामध्ये आम्ही नोकियाच्या तंत्रज्ञान सुविधांचा उपयोग केला आहे.  मला खात्री आहे की, डिजिटल भारताला एक सर्वोत्कृष्ट नेटवर्क उपलब्ध करवून देण्यासाठी केल्या जात असलेल्या आमच्या अथक प्रयत्नांमुळे आम्हाला भविष्यात ५जी युजर्सना श्रेणीतील सर्वोत्तम व्हॉइस व डेटा सेवा पुरवणे सुरु ठेवण्यात मदत होईल.” 

 नोकियाची व्हीओएनआर सुविधा सेवा पुरवठादारांना अनेक नवीन व रोचक अशी, व्हॉइसवर आधारित ऍप्लिकेशन्स पुरवण्यात मदत करत आहे, यामध्ये युजर्सना अधिक जास्त सामावून घेणाऱ्या आणि व्हर्च्युअल रियॅलिटी यूज केसेससाठी इमर्सिव्ह व्हॉइस आणि रिअल टाइम भाषांतर यासारख्या सेवांचा समावेश आहे.

नोकिया आयएमएस व्हॉइस कोअर सेवा ज्यामध्ये आवाज खूप महत्त्वाचा असतो, अशा अभिनव ऍप्लिकेशन्स आणि यूज केसेसमार्फत उत्पन्नाचे नवे मार्ग, अतिशय गरजेची संचालनात्मक लवचिकता आणि आधीपेक्षा कमी नेटवर्क व्यवस्थापन खर्च असे लाभ मिळवून देते.

याआधी गांधीनगरमध्ये नोकियासोबत ५जी चाचण्यांदरम्यान ‘वी’ने ४ जीबीपीएसपेक्षा जास्त वेग नोंदवले असून एआयवर आधारित व्हीआर स्ट्रीमिंग, रूरल कोस्टल गेमिंग, व्हीआर ५जी कनेक्टेड शाळा आणि ३६० डिग्री व्हीआर कन्टेन्ट प्लेबॅक यासारख्या अनोख्या ग्राहक यूज केसेस प्रदर्शित केल्या आहेत.  ‘वी’ ने सुरक्षित नेटवर्क स्लायसिंग यूज केस यशस्वीपणे प्रदर्शित करण्यासाठी नोकियाच्या ५जी रेडिओ ऍक्सेस नेटवर्कचा व ५जी कोअरचा वापर केला तसेच गांधीनगरमध्ये ग्रामीण ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पुरवण्यासाठी मिड-बँडमध्ये ५जीच्या वापराची चाचणी घेतली आहे.


हेही वाचा – वैज्ञानिकांनी शोधला दुर्मिळ Baby Ghost Shark, काय आहे वैशिष्ट्य ?