Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक व्होडाफोन-आयडिया ग्राहकांना बसणार धक्का

व्होडाफोन-आयडिया ग्राहकांना बसणार धक्का

Related Story

- Advertisement -

व्होडाफोन-आयडियाने (VI) ग्राहकांना घक्का बसणार आहे. गेले काही दिवस व्होडाफोन-आयडिया रिचार्जच्या दरात वाढ करणार आहे, अशा चर्चा होत्या. ईटी टेलिकॉमच्या अहवालानुसार टेलिकॉम कंपनी रिचार्जचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढवू शकते. २०२० च्या उत्तरार्धात किंवा २०२१ च्या सुरुवातीच्या काळात रिचार्जचे दर वाढविले जातील.

३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाही निकालाची घोषणा करताना VI चे अधिकारी म्हणाले होते की भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओच्या आधी कंपनी रिचार्जच्या किंमती वाढवू शकते. आतापर्यंत एअरटेल आणि जिओ शुल्कवाढीबाबत शांत आहेत पण व्होडाफोन आयडियाला अनेक आर्थिक दबावांचा सामना करावा लागत आहे. या व्यतिरिक्त, कंपनी सतत ग्राहक गमावत आहे.

- Advertisement -

भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ रिचार्जच्या किंमती वाढवण्यासाठी आणखी थोडा वेळ लागेल. या व्यतिरिक्त, VI ने यापूर्वी शुल्कवाढीसंदर्भात अंतर्गत सल्लामसलत केल्याचेही अहवालात नमूद केले आहे. व्होडाफोन आयडिया १५ टक्क्यांपर्यंत शुल्क वाढवू शकते. मागील वेळी कंपनीने रिचार्जच्या दरात १४ टक्क्यांनी वाढ केली होती.

 

- Advertisement -