Vodafone Idea चे प्रिपेड प्लॅन महागला ; ‘हे’ आहेत नवे दर

डाफोन आयडियाचा बेसिक प्लॅन जो ७९ रुपयांचा होता त्याचे दर वाढून आता हा प्लॅन ९९ रुपयांचा झाला आहे. टॉपअप पॅक ४८ रुपयांवरुन ५८ रुपयाने महागला आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.

Vodafone Idea's prepaid plan expensive; These are the new rates
Vodafone Idea चे प्रिपेड प्लॅन महागला ; 'हे' आहेत नवे दर

आज अनेक जीवनावश्यक गोष्टींवरील महागाई वाढत असताना आता मोबाईल वापरणेसुद्धा महागले आहे. दोन दिवसांपूर्वी एअरटेलने प्लॅनच्या दरात वाढ केली. एअरटेलनंतर आता वोडाफोन आयडिया चे सर्व प्रिपेड प्लॅन्स २५ टक्क्यांनी वाढवले आहेत. हे वाढलेले नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत.आता Vodafone Idea च्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा जवळपास २५ टक्के जास्त पैसे खर्च करावे लागतील.

सर्वाधिक विक्री होणारा प्लॅन आता १७९ रुपयांचा 

वोडाफोन आयडियाचा बेसिक प्लॅन जो ७९ रुपयांचा होता त्याचे दर वाढून आता हा प्लॅन ९९ रुपयांचा झाला आहे. टॉपअप पॅक ४८ रुपयांवरुन ५८ रुपयाने महागला आहे.वोडाफोन आयडियाचा १४९ रुपयांचा सर्वाधिक विक्री होणारा प्लॅन आता १७९ रुपयांचा झाला आहे. या प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता असून, एकूण २ जीबी डेटा, एकूण ३०० SMS आणि अमर्यादित कॉलिंगची सुविधा सर्व नेटवर्कवर उपलब्ध आहे.

१.५ जीबी डेटाचा पॅक २४९ रुपयांवरुन २९९ रुपयांवर आला आहे.या प्लॅनची वैधता २८ दिवस असेल. १ जीबी डेटा पॅक आता २६९ रुपयांचा झाला आहे. आतापर्यंत २१९ रुपयांना एक जीबी डेटा पॅक मिळत होता. २ जीबी डेटा पॅकची किंमत २९९  रुपयांऐवजी ३५९ रुपये झाली आहे. २४ जीबी डेटा पॅक असलेला वार्षिक पॅक १४९९ रुपयांऐवजी १७९९ रुपये इतका महाग झाला आहे.कंपनीने केलेल्या या प्रिपेड प्लॅनच्या दरवाढीमुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे.


हे ही वाचा : Noida International Airport: पंतप्रधान मोदींच्या हस्ते नॉयडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज भूमीपूजन, वाचा वैशिष्ट्ये