घरटेक-वेकअखेर प्रतिक्षा संपली, PUBG प्रेमींसाठी खुशखबर! लवकरच भारतात लाँच होणार PUBG

अखेर प्रतिक्षा संपली, PUBG प्रेमींसाठी खुशखबर! लवकरच भारतात लाँच होणार PUBG

Subscribe

गेल्यावर्षी भारत सरकारने पबजी (PUBG) गेमवर बंदी घातली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत पबजी प्रेमी या गेमच्या लाँचिंगची प्रतिक्षा करत आहेत. पण आता अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. पबजी गेमचे निर्माता कंपनी KRAFTON ने व्हिडिओ टिझर प्रदर्शित करून भारतात नवीन गेम लाँच करण्याची घोषणा केली आहे. व्हिडिओ टिझरनुसार, BATTLEGROUNDS MOBILE INDIA नावाने हा पबजी गेम प्रदर्शित करणार आहेत. पण टीझरमध्ये लाँचिंगच्या तारखेचा खुलासा केला नाही आहे.

KRAFTON ने म्हटले की, ‘पहिल्यांदा भारतीय युझरसाठी बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाची प्री रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यानंतर मोबाईल गेम लाँच केला जाईल. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया हा गेम फक्त भारतीय युझर्ससाठी असणार आहे.’

- Advertisement -

कंपनीने सांगितले की, ‘युझर्सची प्रायव्हसी आणि डेटा सुरक्षा ही आमची पहिली प्राथमिकता आहे. इतर कंपन्यांसोबत आम्ही डेटा सुरक्षितेसाठी काम करत आहोत. तसेच केंद्र सरकारच्या नियमांनुसार गेमचे डेटा सेंटर भारतामध्ये बनवले जाईल.’

माहितीनुसार, गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये भारत सरकारने पबजीसह ११८ मोबाईल Appवर बंदी घातली होती. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले की, ‘भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी, भारताचे संरक्षण, राज्य सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी ११८ मोबाइल App धोकादायक आहेत. भारतीय युझर्सची सुरक्षितेची बाब लक्षात घेऊन ही बंदी घालण्यात आली होती.’

- Advertisement -

हेही वाचा – Corona Vaccination: आता Paytmवर मिळणार कोविड लसीकरण स्लॉट माहिती, कशी ती जाणून घ्या


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -