घरटेक-वेकAadhaar Card वर मोबाईल नंबर अपडेट करायचाय? मग फॉलो करा 'या' सोप्या...

Aadhaar Card वर मोबाईल नंबर अपडेट करायचाय? मग फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

Subscribe

Link Aadhaar Card To Mobile Number : तुमचा मोबाईल नंबक तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे का? तसे नसल्यास तुमचे खूप मोठं नुकसान होऊ शकते. जर तुमचा फोन नंबर तुमच्या आधारशी लिंक नसेल तर तुम्ही अनेक सरकारी काम सहज पूर्ण करू शकता. त्यामुळे मोबाईल नंबर आधार क्रमांकाशी लिंक करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण त्याशिवाय तुम्ही कोणत्याही ऑनलाइन किंवा ऑफलाइन सेवेचा लाभ घेऊ शकणार नाही.

आधार कार्ड अनेक सरकारी तसेच खाजगी सेवांचा लाभ घेण्यासाठी मदत करते. विशेषतः बँकिंग आणि फायनान्सशी संबंधित कामं. उदाहरणार्थ, क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना तुम्हाला OTP द्वारे आधार डिटेल्स व्हेरिफाय करणे आवश्यक आहे. पण जर तुमचा आधार तुमच्या नंबरशी लिंक केलेला नसेल आणि तुम्हाला त्याची पद्धत देखील माहित नसेल, तर आज आम्ही तुम्हाला ते कसे करायचे ते सांगणार आहोत. खाली दिलेल्या काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी सहजपणे लिंक करू शकता.

- Advertisement -

आधार कार्ड मोबाईल नंबरशी कसे लिंक करावे

१) तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर अपॉइंटमेंट बुक करावी लागेल. यासाठी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.

२) यानंतर तुम्हाला एक ड्रॉपडाउन मेन्यू मिळेल ज्यामध्ये तुम्हाला लोकेशनवर जावे लागेल. यानंतर आधार सेवा केंद्रातील Book A Appointment टॅप करा.

- Advertisement -

३) यानंतर तुम्हाला Aadhaar Update/Correction Form ची प्रिंटआउट घ्यावी लागेल.

४) अपॉइंटमेंटच्या तारखेला आधार नोंदणी केंद्राला भेट द्या. त्यानंतर आधार एक्झिक्युटिव्हला फॉर्म द्या.

५) मग एक्झिक्युटिव्ह तुम्हाला URN नंबर आणि रिसीप्ट देखील देईल.

6) तुम्ही या रिसीप्टमध्ये दिलेल्या नंबरद्वारे केलेल्या बदलांची अपडेट स्थिती तपासू शकता.

7) या प्रोसेसला थोडा वेळ लागू शकतो. यासाठी तुम्हाला 25 रुपये फी भरावी लागेल.


मुंबै बँक बोगस मजूर प्रकरण! प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -