घरटेक-वेकजाणून घ्या OnePlus7 आणि OnePlus7 Pro मोबाईलचे फिचर्स

जाणून घ्या OnePlus7 आणि OnePlus7 Pro मोबाईलचे फिचर्स

Subscribe

गेल्या कित्येक दिवसांपासून OnePlus कंपनीच्या नव्या सिरीजचे मोबाईल लॉन्च होणार असल्याची चर्चा सुरु होती. आता कंपनीने १४ मे ला OnePlus7 आणि OnePlus7 Pro मोबाईल लॉन्च होणार असल्याची अधिकृत माहिती दिली आहे.

OnePlus कंपनी १४ मे रोजी आपला नवा मोबाईल OnePlus7 लॉन्च करणार आहे. या संदर्भात OnePlus कंपनीनने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर माहिती दिली आहे. या मोबाईल संदर्भात गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा सुरु होती. मध्यंतरी या मोबाईलच्या फिचर्ससंबंधी देखील माहिती लीक झाल्याचे वृत्त समोर आले होते. OnePlus7 मध्ये काहीतरी वेगळे फिचर्स असतील अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. त्यामुळे या फोनची ताटकळतपणे काही चाहते वाट बघत आहेत.

काय आहेत फिचर्स?

  • OnePlus7 आणि OnePlus7 Pro असे दोन मोबाईल येत्या १४ मे रोजी लॉन्च होणार आहेत. हे फोन दोन विभागांमध्ये लॉन्च होणार आहेत. एक फोन 6GB रॅम तर 128GB रोम आणि दुसरा फोन 8GB रॅम तर 256GB रोम असे फरक या दोन्ही मोबाईलमध्ये आहेत. कंपनी यासोबतच आणखी एक मोबाईल लॉन्च करणार आहे. त्यामध्ये
    12GB रॅम आणि 256GB रोम, अशी मेमरी असणार आहे.
  • दोन्ही मोबाईलमध्ये लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 855 पोससेसर असणार आहे.
  • OnePlus7 या मोबाईलमध्ये ६.४ इंचचा FHD+ डिस्प्ले असणार आहे. तर OnePlus7 Pro मध्ये ६.७ इंचचा QHD+ डिस्प्ले असणार आहे.
  • या दोन्ही मोबाईलमध्ये 5G इंटरनेट कनेक्टीव्हिटी असणार आहे.
  • OnePlus7 Pro मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा हा 48 मेगापिक्सलचा असणार आहे. तर दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा असणार आहे. या कॅमेऱ्यामध्ये 3x ऑप्टिकल जूम असणार आहेत. तर तिसरा कॅमेरा जो फोनच्या मागच्या बाजूला असेल तो १६ मेगा पिक्सलचा असणार आहे.
  • या दोन्ही फोनमध्ये 44 w रॅप चार्जिंग सोबत 4000 mah ची बॅटरी असणार आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -