घरटेक-वेकमोबाइल क्लोनिंग म्हणजे काय? सेलिब्रिटी ड्रग्ज कनेक्शननंतर WhatsApp सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

मोबाइल क्लोनिंग म्हणजे काय? सेलिब्रिटी ड्रग्ज कनेक्शननंतर WhatsApp सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील अनेक थरारक रहस्य बाहेर येत आहेत. ड्रग्जचे प्रकरण यापैकीच एक आहे. यात आता अनेक दिग्गज नावे अडकली असून त्यांची चौकशी सुरु आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सुरुवातील रिया चक्रवर्ती आणि त्यानंतर जया साहा यांचा मोबाइल क्लोन करुन WhatsApp वरील चॅट्स मिळवले. या चॅटच्या आधारेच सध्या दीपिका पदुकोन आणि इतर अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. यानंतर मोबाइल क्लोनिंगद्वारे आपल्या फोनमधील सर्व माहिती मिळवली जाऊ शकते, अशी धास्ती आता सर्वांना लागली आहे.

WhatsApp सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

मोबाइल क्लोनिंगमुळे WhatsApp सुरक्षित आहे का? यावर आता प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामुळेच WhatsApp क्लोनिंग हा विषय ट्विटरवर काही काळ टॉप ट्रेडिंगमध्ये होता. आता प्रश्न उभा राहतो की, मोबाइल क्लोनिंग म्हणजे नक्की काय? ज्याद्वारे कोणाचीही परवानगी न घेता सर्व डेटा कॉपी केला जाऊ शकतो.

- Advertisement -

मोबाइल क्लोनिंग काय आहे?

क्लोनिंगच्या माध्यमातून कोणात्याही मोबाइलचा डेटा आणि सेल्युलर ओळख नव्या फोनमध्ये कॉपी करता येते. वैयक्तिक पातळीवर मोबाइल क्लोनिंग भारतात बेकायदेशीर आहे. मात्र तपास यंत्रणा अपवादात्मक परिस्थितीत फॉरेन्सिक मार्गाद्वारे काही जणांचा मोबाइल क्लोनिंग करतात. या प्रक्रियेत इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी (IMEI) नंबरद्वारे डेटाचा एक्सेस मिळतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आपण WhatsApp अकाऊंट जेव्हा एका मोबाइल फोनद्वारे दुसऱ्या मोबाइलमध्ये लॉग इन करतो, तेव्हा देखील ही एक प्रकारची क्लोनिंगच असते. ज्याद्वारे आपण डेटा क्लाउड स्टोरेजवरुन दुसऱ्या मोबाइलमध्ये हस्तांतरीत करतो.

मोबाइल क्लोनिंग तपासात फायदेशीर ठरते?

गुन्हेगारी प्रकरणांमध्ये हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरलेले आहे. नायर रुग्णालयातील पायल तडवी आत्महत्या प्रकरणात हे तंत्रज्ञान वापरुन पायलचे जुने चॅट्स आणि फोटो मिळवण्यात आले होते. पायलच्या पालकांनी तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर महाराष्ट्र फॉरेन्सिक सायन लॅबने तिच्या मोबाइलचे क्लोनिंग करुन डिलीट केलेला डेटा मिळवला. यामध्ये पायलने लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली. जी तीन आरोपी डॉक्टरांनी डिलीट केली होती. ही नोट कोर्टात सबळ पुरावा ठरणार असल्याचे सांगितले जाते.

- Advertisement -

What is Mobile Cloning which raises questions on whatsapp security

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -