घरटेक-वेकSIM-Swap म्हणजे नेमक काय? ज्याने बँक अकाउंट केले जातेय मिनिटात खाली, कशी...

SIM-Swap म्हणजे नेमक काय? ज्याने बँक अकाउंट केले जातेय मिनिटात खाली, कशी टाळाल ही फसवणूक

Subscribe

मोबाईलमध्ये येणारे बँक स्टेटमेंन्ट,ऑनलाईन बँकिंग व्यवहार सतत तपासा

सध्या ऑनलाईनमुळे पैसे ट्रान्सफर करणे किंवा मिळवणे अगदी मिनिटाचे काम झाले आहे. यापर्वी आपल्याला यासाठी बँकेत जाऊन भली मोठी प्रोसेस करावी लागत होती. परंतु हे ऑनलाईन पैशांच्या व्यवहारामुळे अनेक युजर्स आता अडचणीत सापडले आहे. सध्या प्रत्येकाजवळ स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेक जण ऑनलाईन हॉटेल बुकिंग, तिकिट बुकिंग, आणि इतर बँकिंग सेवा ऑनलाईन मिळत आहे. परंतु या ऑनलाईन सेवांचा फायदा घेत असतानाच आपल्या स्मार्टफोनमधून सिम क्लोनिंग आणि सिम स्वॅपिंग केले जात आहे. यातून ऑनलाईन ठग तुमचे बँक अकाउंट काही समजण्याच्या आतच रिकामी करतं आहेत. त्यामुळे सिम क्लोनिंग किंवा सिम स्वॅपिंग नेमके काय काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

सिम स्वॅप म्हणजे काय?

एक्सपर्टच्या मते, सिम स्वॅपिंग म्हणजे सिम एक्सचेंज करणे. या सिम स्वॅपिंग आणि सिम क्लोनिंगच्या माध्यमातून सध्या ऑनलाईन फसवणूक सहज करता येतेयं. काही ऑनलाईन फसवणूक करणारे गुन्हेगार एका व्यक्तिच्या नावे असणाऱ्या सिम कार्डचे डुप्लिकेट सिमकार्ड बनवत आहेत. त्यानंतर आपल्या फोन नंबरवरून ते नवे डुप्लिकेट सिम कार्ड रजिस्ट्रेशन करत आहे. यामुळे आपले सिमकार्ड बंद होते. यामुळे आपल्या नंबरवर रजिस्ट्रर झालेल्या दुसऱ्या नंबरवर (डुप्लिकेट) बँकेसंबधीत किंवा अन्य कामाचे आलेले OTP जात आहेत. अशाप्रकारे तुमच्या ओटीपीचा वापर करत ऑनलाईन ठग तुमचे अकाउंट काही मिनिटातचं रिकामी करत आहेत.

- Advertisement -

कशी टाळाता येईल ‘ही’ फसवणूक ?

एक्सपर्ट सांगतात, जर तुमच्या मोबाईल फोनचे नेटवर्क सतत जात असेल, किंवा तुमच्या फोनवर येणारे फोन कॉल बंद झाले असतील किंवा कोणताही अलर्ट येत नसेल तर लवकरचं तुम्ही तुमच्या मोबाईल सिम ऑपरेटरकडे तक्रार करावी. तसेच आपला फोन नंबर चुकूनही सोशल मीडियावर शेअर करु नका. आपला फोन नंबर सिम स्वॅपिंगसाठी वापरला जात असल्याचा संशय आल्यास त्वरित आपल्या मोबाईल ऑपरेटला त्याची माहिती द्या.

मोबाईलमध्ये येणारे बँक स्टेटमेंन्ट,ऑनलाईन बँकिंग व्यवहार सतत तपासा

अनेकदा हे फसवणुक करणारे ऑनलाईन ठग आपल्याला अनेक नंबरवरून कॉल करण्यास सुरुवात करतात. यावेळी आपल्याला वाटले की अज्ञात नंबरवरून कॉल येत आहेत तर फोन बंद केला पाहिजे. परंतु ही देखील ऑनलाईन फसवणुक करणाऱ्यांची चाल असू शकते, हे ऑनलाईन ठर तुम्हाला सतत फोन करत राहतात जेणेकरून तुम्ही मोबाईल स्विच ऑफ करुन ठेवाल आणि ज्यामुळे तुम्हाला तुमच्या फोन नेटवर्कमध्ये काय गडबड किंवा छेडछाड झाली हे समजू शकणार नाही. यामुळे युजर्सने आता आपल्या मोबाईलमध्ये येणारे बँक स्टेटमेंन्ट आणि ऑनलाईन बँकिंग व्यवहार तपासले पाहिजेत जेणेकरून अशा ऑनलाईन फसवणूकीपासून वाचता येईल.

- Advertisement -

Sushant Singh Rajput death anniversary : सुशांत – अंकिताचे असे एक रोमॅंटिक गाणे, जे अद्यापही रिलीजचं झाले नाही


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -