घरटेक-वेकमोबाईल पावसात भिजल्यावर 'या' गोष्टी अजिबात करु नका

मोबाईल पावसात भिजल्यावर ‘या’ गोष्टी अजिबात करु नका

Subscribe

सध्या पावसाळा सुरु आहे. देशाच्या प्रत्येक भागात सतत पाऊस पडत आहे मात्र, पावसातही लोकांचे काम थांबलेले नाही. पावसात कामासाठी बाहेर पडतो तेव्हा अनेकदा आपला फोन चुकून पाण्यात पडतो. त्यानंतर फोन बंद तर पडला नसेल ना, या विचारत आपण अनेक चुका करुन बसतो आणि चालू फोन बंद पडतो. मात्र, या चुका व्हायला नको यासाठी जाणून घेऊया स्मार्टफोन पावसात भिजल्यास काय करावे आणि काय करू नये ते…

फोन पावसात भिजल्यास प्रथम फोन चालू असल्यास तो बंद करणे आणि कोणतेही बटण दाबण्याचा किंवा फोन चालू करण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे फोनमध्ये शॉर्ट सर्किट होण्याचा धोका टळतो. आपल्याकडे बॅटरी काढण्याची सुविधा असलेला जुना फोन असल्यास फोनची बॅटरी, मेमरी कार्ड आणि सिम कार्ड हळुवार काढा. फोनमध्ये बॅटरी काढण्याचा पर्याय नसल्यास शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो. आता पंख्याखाली किंवा हेयर ड्रायरने फोन कोरडा करा. फोनमध्ये दिसणारे पाणी स्वच्छ कपड्याने किंवा कागदाच्या रुमालाने पुसून टाका.

- Advertisement -

हेअर ड्रायर नसल्यास फोन तांदळाच्या डब्यात ठेवा, परंतु हेडफोन जॅकमध्ये तांदूळ चालणार नाही याची काळजी घ्या. कमीतकमी २४ तास फोन सुकविण्यासाठी सोडा. ओला फोन सुकविण्यासाठी हा सर्वात कार्यक्षम आणि सोपा मार्ग आहे. आता तांदळातील फोन काढा आणि चालू करा. जर फोन चालू होत नसेल तर तो चार्जिंगला लावा आणि त्यानंतर काही अडचण आल्यास मोबाइल दुरूस्तीच्या दुकानात जा. किंवा थेट सेवा केंद्रावर जा.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -