घरटेक-वेकव्हॉट्स अ‍ॅपच्या ग्रुपवर करता येणार प्रायव्हेट चॅटिंग

व्हॉट्स अ‍ॅपच्या ग्रुपवर करता येणार प्रायव्हेट चॅटिंग

Subscribe

व्हॉट्स अ‍ॅप हे सर्वात प्रसिद्ध अ‍ॅप आहे. त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे व्हॉट्स अ‍ॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन अपडेट्स घेऊन येत असतं. आता ग्रुप चॅटिंगमध्येही प्रायव्हेट चॅटिंग करता येणार

व्हॉट्स अ‍ॅप हे असं अ‍ॅप आहे जे आपल्या युजर्ससाठी नेहमीच काही ना काहीतरी नवे घेऊन येत असते. आता पुन्हा एकदा व्हॉट्स अ‍ॅपने आपले फीचर अपडेट केले आहे. या फीचरद्वारे आता युजर्सना ग्रुप चॅटमध्येही प्रायव्हेट रिप्लाय करता येणार आहे. या फीचरमुळे आता ग्रुपमध्ये राहूनही तुम्ही एखाद्या व्यक्तीला खासगी मेसेज पाठवू शकणार आहात. ग्रुपमधल्या इतर व्यक्तींना त्याची कल्पनाही येणार नाही. बर्‍याचदा ग्रुपमध्ये काही संभाषण चालू असल्यास, एखाद्या व्यक्तीला पुन्हा सर्च करून वेगळा मेसेज करावा लागतो. पण आता या फीचरमुळे ग्रुपमध्ये असतानाच खासगी मेसेज करता येणार आहे. सध्या हे फीचर व्हॉट्स अ‍ॅप अँड्रॉईड बीटा अ‍ॅपवर आणण्यात आले आहे.

कसा पाठवू शकता खासगी मेसेज?

व्हॉट्स अ‍ॅप खासगी रिप्लाय या फीचरचा वापर करण्यासाठी युजर्सद्वारे पाठविण्यात आलेल्या त्या मेसेजला होल्ड करावे लागेल, ज्याला खासगी रिप्लाय द्यायचा आहे. त्यानंतर अगदी वरती उजव्या बाजूच्या कोपर्‍यात दिसणार्‍या तीन डॉटच्या मेन्यूवर टॅप करावे लागेल. इथेच तुम्हाला खासगी रिप्लाय करण्याचा पर्याय दिसेल. तुम्ही हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्याद्वारे निवडण्यात आलेला मेसेज सेंडरच्या खासगी चॅट विंडोमध्ये रिप्लायच्या स्वरुपात उघडेल. व्हॉट्स अ‍ॅपचे हे खासगी रिप्लाय फीचर व्हर्जन २.१८.३३५ वर उपलब्ध आहे.

- Advertisement -

तर फन स्टीकर्सदेखील व्हॉट्स अॅपचे नवे फीचर

व्हॉट्स अ‍ॅप आता आपल्या युजर्ससाठी फन स्टिकर्स हे नवं अपडेट घेऊन येत आहे. आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्टवर येणार्‍या आठवड्यात आयओएस आणि अँड्रॉईडवरील सर्व युजर्ससाठी फन स्टीकर्स आणत असल्याची घोषणा व्हॉट्स अ‍ॅपकडून करण्यात आली आहे. तर बर्‍याच लोकांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर अपडेटनंतर याच आठवड्यामध्ये हे स्टिकर्स आल्याची माहिती समोर आली आहे. व्हॉट्स अ‍ॅपच्या या फीचरमुळे आता युजर्स आता हाईक अथवा व्हीचॅटप्रमाणे आपल्या मूडप्रमाणे फन स्टीकर्स वापरून मजेने चॅट करू शकणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -