Samsung Galaxy A13 5G: सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5G फोन, काय आहे किंमत?

२०२२च्या सुरुवातीला हा फोन लाँच होण्याची शक्यता

Whats the Price of Samsung's Cheapest Samsung Galaxy A13 5G smartphone
Samsung Galaxy A13 5G: सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5G फोन, काय आहे किंमत?

सॅमसंग लवकरच त्याचा सर्वात स्वस्त 5G स्मॉर्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. Samsung Galaxy A13 5G हा फोन लाँच होण्याआधीच त्याचे फिचर्स आणि किंमत समोर आली आहे. हा फोन २०२२च्या सुरुवातीला लाँच होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुासर Samsung Galaxy A13 5G हा फोन ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेंशन 700 चिपसेटसोबत मिळणार आहे. ज्यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे. त्याचप्रमामे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि ५०००mAh ची बॅटरी देणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी Galaxy 1 13 5G फोन लाँच करण्यात आला होता या फोनची जागा आता Samsung Galaxy A13 5G हा फोन घेणार आहे. काय आहेत या फोनचे फिचर्स आणि त्याची किंमत काय असेल जाणून घ्या.

Samsung Galaxy A13 5G या फोनची किंमत साधारण २९० डॉलर म्हणजेच २१,७०० रुपये असेल असे सांगितले जात आहे. Samsung Galaxy A सीरिजचा हा लेटेस्ट स्मॉर्टफोन ब्लॅक,ब्लू, रेड आणि व्हाइट कलरमध्ये उपलब्ध होणार आहे. फोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाइल नॉच सोबत डिस्प्ले, सेल्फी कॅमेरा आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट देण्यात आली आहे. फोनच्या खालच्या भागात ३.५ mm चा हेडफोन जॅक देण्यात आला आहे. ज्यात टाइप c पोर्ट आणि एक स्पीकर ग्रिल देण्यात आले आहे.

Samsung Galaxy A13 5Gमध्ये ६.४८ इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसोबतच फोनमध्ये ५०MPचा प्रायमरी वाइड सेंसर, ५MP चा अल्ट्रा वाइड सेंसर आणि २MP चा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. Samsung Galaxy A13 5G या फोनमध्ये ४जीबी रॅम आणि ६४, ८ आणि १२८जीबी स्टोरेज ऑप्शन देण्यात आला आहे.

 


हेही वाचा – काय आहे Blue Color Aadhaar Card? कोण करू शकते अप्लाय? जाणून घ्या