घरटेक-वेकWhatsApp 5 Upcoming features: आता चॅटिंग करण्याचा अंदाज बदलणार; जाणून घ्या नवे...

WhatsApp 5 Upcoming features: आता चॅटिंग करण्याचा अंदाज बदलणार; जाणून घ्या नवे फिचर्स

Subscribe

मागील बऱ्याच काळापासून व्हॉट्सॲप काही फिचर्सच्या चाचण्या करत असून त्याची आता अंतिम टप्प्यात चाचणी सुरू आहे. हे नवे फिचर्स व्हॉट्सॲपकडून लवकरच रोलआउट म्हणजे आणले जाईल. व्हॉट्सॲपचे हे नवे फिचर्स आल्यानंतर व्हॉट्सॲप चॅटिंग आणि मीडिया फाईल्स शेअरिंग करण्याचा अंदाज बदलेल.

व्हाईस नोट फिचर

इंस्टँट मॅसेजिंग प्लेटफॉर्म व्हॉट्सॲप एक ग्लोबल व्हाईस मॅसेजिंग प्लेअर सर्व्हिसवर काम करत आहे. म्हणजे युजर्स कोणताही व्हाईस मॅसेज पाठवण्यापूर्वी तो ऐकू शकतील. WabetaInfo रिपोर्टच्या माहितीनुसार, नव्या अपडेटमध्ये व्हाईस मॅसेज टॉप मेन्यूमध्ये पिन राहिल. तसेच प्रत्येक सेक्शन किंवा चॅटबॉक्सच्या टॉपमध्ये वॉईस मॅसेज डिस्प्ले होईल, येथून प्ले आणि पॉझ केले जाऊ शकेल. यामुळे व्हाईस नोट पाठवण्यास लोकांना सोयीस्कर ठरेल. युजर्स व्हाईस नोट रेकॉर्ड करताना तो पॉझ देखील करू शकतात.

- Advertisement -

रिडिझाईन चॅट बबल

नुकतंच व्हॉट्सॲपने बीटा युजर्ससाठी 2.21.200.11 अपडेट जारी केला होता. या अपडेटमध्ये युजर्ससाठी नवा चॅट बबल जारी केला गेला आहे. लवकरच अँड्रॉईड आणि आयओएससाठी चॅट बबल डिझाईन जारी केली जाऊ शकते. अलीकडेच WABetaInfoने अँड्रॉईड बीटा ॲपमध्ये पाहिले होते. पहिल्यापेक्षा हा राउंडेड, मोठा आणि जास्त कलरफूल असेल.

कस्टम प्रायव्हसी सेटिंग

WhatsApp बीटा ट्रॅकर WABetaInfoकडून जारी करण्यात आलेल्या स्क्रीनशॉटमधून नवीन कस्टम प्रायव्हसी सेटिंगची माहिती मिळाली आहे. नवीन अपडेटनुसार युजर्स काही लोकांचे स्टे्ट हाईड करू शकतील. म्हणजेच तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील सामील असलेल्या काही लोकांनी आपले स्टेट्स पाहावे असे वाटत असेल, तर त्यासाठी My Contacts Expect ऑप्शन दिला जाईल. शिवाय Last Seen, Profile Photo आणि About हे ऑप्शन देखील अपडेट केले जाऊ शकतात.

- Advertisement -

नवीन बॅकअप फिचर

व्हॉट्सॲप लवकरच नवे चॅट बॅकअप फिचर आणू शकते. जे युजर्स क्लाउट स्टोअरवर स्टोरेजची सुविधा देईल. यासाठी एक डेडिकेटेड चॅट बॅकअप सपोर्ट दिला जाऊ शकतो.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -