Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर टेक-वेक whatsapp कडून महिनाभरात २० लाखांहून अधिक अकाउंट केले बंद, जाणून घ्या कारण

whatsapp कडून महिनाभरात २० लाखांहून अधिक अकाउंट केले बंद, जाणून घ्या कारण

whatsappने जारी केलेल्या कम्प्लायंस रिपोर्टमध्ये १५ मे पासून ते १५ जून पर्यंत २० लाख ११ हजार वापरकर्त्यांचे अकाउंट बंद

Related Story

- Advertisement -

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म whatsapp कडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, एका महिन्यात २० लाखांहून अधिक भारतीय वॉट्सअप वापरकर्त्यांचे अकाउंट बंद करण्यात आले आहे. याबाबत वॉट्सअपनं आपल्या मासिक अहवालात खुसाला केला आहे. नव्या माहिती तंत्रज्ञान नियम लागू केल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. नव्या नियमावलीअंतर्गत सोशल मीडिया कंपन्यांना दर महिन्याला कम्प्लायंस रिपोर्ट (Compliance Report) जारी करावे लागणार आहे. याच नियमानुसार whatsappने गुरावारी मासिक अहवाल जारी केला आहे.

whatsappने जारी केलेल्या कम्प्लायंस रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, १५ मे पासून ते १५ जून पर्यंत २० लाख ११ हजार वापरकर्त्यांचे अकाउंट बंद करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हे अकाउंट बंद करण्यात आले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

whatsapp अकाउंट banned कधी करते?

- Advertisement -

whatsapp कंपनीच्या नुसार जर कोणी बेकायदेशी, अश्लील, अवमानजनक, धमकावणे, घाबरवणे, द्वेष पसरवणे, आणि जातीभेद पसरवरण्याचा प्रयत्न करत असेल किंवा बेकायदेशीर व्यवहार, गैरवर्तन करुन चिथावणी देण्यासाठी whatsapp अकाउंट वापरण्यात येत असेल तर अशा अकाउंटवर whatsapp कारवाई करुन बंद करत आहे. तसेच कोणताही वापरकर्ता जर whatsappच्या नियमावालीचं उल्लंघन करत असेल तर त्याचे अकाउंट बंद करण्यात येत आहे.

काय आहे नवी नियमावली

केंद्र सरकारने आणलेली माहिती आणि तंत्रज्ञान नवी नियमावालीचे सर्व सोशल मीडियाला लागू करण्यात आली आहे. नव्या नियमावलीला डिजिटल एथिक्स कोड रुल्स २०२१ पण म्हटलं जाते. यामध्ये नियम ४(डी) नुसार सोशल मीडिया कंपन्यांना दरमहिना कंप्लायंस रिपोर्ट जारी कारावा लागणार आहे. या अहवालात कंपन्यांना सांगावे लागणार आहे की, महिनाभरात किती ग्राहकांनी तक्रारी केल्या आणि किती लोकांच्या तक्रारी मार्गी लावण्यात आल्या याबाबत अहवालात सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे.

- Advertisement -