ब्रेकिंग न्यूज: Whatsapp, Facebook आणि Instagram झालं डाऊन

WhatsApp, Facebook, Instagram server down
Whatsapp, Facebook आणि Instagram झालं डाऊन

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम जगातील अनेक भागांमध्ये आज, सोमवारी रात्री अचानक काम करेनासे झाले आहे. ‘सॉरी, काही तरी अडचण आहे. आम्ही काम करत आहोत. आम्ही लवकरात लवकर ही तांत्रिक अडचण दूर करू,’ असे फेसबुकच्या वेबसाईटवरील संदेशात स्पष्ट केले. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम रात्री ९ वाजल्यापासून अ‍ॅसेस होत नसल्याची ट्विट अनेकांनी ट्विटरवर केली आहेत. वेबसाईट डाऊनडिटेक्टर डॉट कॉम जी वेबसेवा ट्रॅक करते, त्यांनीही आमच्याकडे युजर्सच्या अनेक तक्रारी आल्याचे म्हटले आहे. या वेबसाईटवर २० हजारांपेक्षा जास्त लोकांनी फेसबुक, इन्स्टाग्राम कार्यरत नसल्याच्या तक्रारी केल्या आहे.. (WhatsApp, Facebook, Instagram server down)

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅप देखील १४ हजारांपेक्षा जास्त युजर्ससाठी डाऊन झाले आहे. तर मेसेंजर्स ३ हजारपेक्षा जास्त युजर्ससाठी डाऊन आहे. काही तरी तांत्रिक कारणामुळे सोमवारी रात्री ९ वाजल्यापासून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाले. फेसबुकवर करण्यात आलेल्या पोस्ट जात नव्हत्या. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवरील पोस्टही अपलोड होत नव्हत्या. अनेकजण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर असतात. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे पोस्ट होत नव्हत्या की पोस्ट येत नव्हत्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. यापूर्वी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप १९ मार्च आणि ९ एप्रिल रोजी सुमारे ४५ मिनिटांसाठी डाऊन झाले होते.

वेब आणि स्मार्टफोन या दोन्ही ठिकाणी तिन्ही अप चालत नाहीत. अँड्रॉइड, आयओएस आणि वेबवर तिन्ही अ‍ॅप ठप्प आहेत. लोकांनी पाठवलेले मॅसेज अर्ध्यावरच अडकले आहेत. डाउन डिटेक्टरवर लोकांनी याबाबतच्या तक्रारी दिल्या आहेत. भारतात फेसबुकचे ४१० दशलक्षाहून अधिक, व्हॉट्सअ‍ॅपचे ५३० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. इन्स्टाग्रामचे भारतात २१० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे.

फेसबुकने केली दिलगरी व्यक्त 

दरम्यान फेसबुकच्या वेबसाईटच्या मॅसेजमध्ये लिहिले होते की, ‘क्षमा करा. काही तरी चुकलं आहे. आम्ही याच्यावर काम करत आहोत आणि जितक्या लवकर शक्य होईल, तितक्या लवकर आम्ही दुरुस्त करू.’ तसेच आता फेसबुकने म्हटले आहे की, ‘युजर्सना आमच्या अॅप्स आणि उत्पादनाचा एक्सेसचा वापर करताना समस्या येत आहेत. आम्ही शक्य तितक्या लवकर गोष्टी पूर्ववत करण्याकरता काम करत आहोत. तुमच्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.’

व्हॉट्सअ‍ॅप म्हणाले..

आम्हाला जाणीव आहे की, सध्या काही लोकांना व्हॉटसअ‍ॅपबाबत अडचणी येत आहेत. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. लवकरात आम्ही आपणास अपडेट पाठवू.