घरटेक-वेकWhatsApp: व्हॉटसप युजर्ससाठी आनंदाची बातमी,15 मे नंतर देखील अकाऊंट होणार नाही डिलिट

WhatsApp: व्हॉटसप युजर्ससाठी आनंदाची बातमी,15 मे नंतर देखील अकाऊंट होणार नाही डिलिट

Subscribe

डेटा हा व्हॉटसप तर्फे फेसबुकला शेअर करण्यात येणार असल्याचे पॉलिसी मध्ये लिहले आहे . यामुळे असंख्य व्हॉटसप युजर्समध्ये डेटा शेरिंग बाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारे मेसेजिंग अॅप्लीकेशन पैकी व्हॉटसप(WhatsApp) यूजरची संख्या सर्वाधिक आहे. आणि आता व्हॉटसपतर्फे त्यांच्या ग्राहकांसाठी म्हणजेच व्हॉटसप वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जर 15 मे पर्यंत व्हॉटसप वापरकर्त्यांनी नवीन आलेल्या व्हॉटसप प्रायव्हसी पॉलिसीला अॅक्सेप्ट नसेल केलं तर त्यांचे अकाऊंट  व्हॉटसप डिलिट करणार नाही. व्हॉटसप कंपनीतर्फे प्रायव्हसी पॉलिसीची डेडलाइन 15 मे पासून पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे अनेक व्हॉटसप यूजर्सना दिलासा मिळणार असल्याचे दिसत आहे. याआधीच्या व्हॉटसपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसी यूजर्सना अॅक्सेप्ट करण्यास सांगण्यात आले होते. आणि जर असे न केल्यास व्हॉटसप अकाऊंट डिलिट केलं जाणार असल्याचे व्हॉटसपतर्फे घोषित करण्यात आले होते. पण सर्व स्तरावरून या नव्या पॉलिसीला विरोध होऊ लागला. तसेच व्हॉटसप युजर्सने सिग्नल अॅप, टेलिग्राम अॅप सारखे दुसरे अन्य मेसेजिंग अॅप्लीकेशनचे विकल्प शोधण्यास सुरुवात केली. या सर्व विरोध प्रदर्शन पाहता व्हॉटसपने कंपनीतर्फे डेडलाईन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

व्हॉटसपच्या नवीन पॉलिसी बाबत लोकांचा का होतोय विरोध-
व्हॉटसपमधील नवीन प्रायव्हसी पॉलिसी मध्ये युजर्सचा डेटा हा व्हॉटसप तर्फे फेसबुकला शेअर करण्यात येणार असल्याचे पॉलिसी मध्ये लिहले आहे. यामुळे असंख्य व्हॉटसप युजर्समध्ये डेटा शेरिंग बाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – अखेर प्रतिक्षा संपली, PUBG प्रेमींसाठी खुशखबर! लवकरच भारतात लाँच होणार PUBG

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -