घरटेक-वेकWhatsApp Hijacking: व्हॉट्सअपद्वारे होतेय अनेकांची फसवणूक; आताच व्हा सावध

WhatsApp Hijacking: व्हॉट्सअपद्वारे होतेय अनेकांची फसवणूक; आताच व्हा सावध

Subscribe

महाराष्ट्र सायबर सेल विभागाने WhatsApp Users साठी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ऑनलाईन चोरटे (Cyber Crooks) फसवणुकीचे नवनवीन मार्ग शोधत असतात. तर सायबर सेल या नवीन मार्गांबाबतची जागृती लोकांमध्ये करत असते. सायबर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या सायबर सुरक्षा विभागाने आता व्हॉट्सअप वापरकर्त्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. ऑनलाईन चोरटे व्हॉट्सअपचे अकाऊंट हायजॅक करुन वापरकर्त्यांकडून खंडणी वसूल करत आहेत.

एखाद्याचा व्हॉट्सअप अकाऊंटचा एक्सेस मिळाल्यानंतर चोरटे त्याला त्याचे आक्षेपार्ह फोटो पाठवतात किंवा आक्षेपार्ह चॅटिंगचे स्क्रिनशॉट शेअर करतात. हे फोटो त्याच्या संपर्क यादीतील इतर मित्र आणि ग्रुप्सवर पाठवण्याची धमकी देतात. यावर जागृती करताना महाराष्ट्राच्या सायबर विभागाने म्हटले आहे की, “या मार्गाने वापरकर्त्यांकडून पैसे उकळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हॅकर वापरकर्त्याचे आक्षेपार्ह फोटो तो किंवा ती व्यक्ती सामील असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवतात. तसेच पीडित व्यक्तिच्या संपर्काद्वारे अकाऊंट हॅक करुन पैशांची मागणी करतात.”

- Advertisement -

सायबर सेलने ही गुन्ह्याची नवीन पद्धत समजावून सांगितली. वापरकर्ते जेव्हा आपला हँडसेट बदलतात तेव्हा नव्या हँडसेटमध्ये व्हॉट्सअप डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल नंबर तपासण्यासाठी व्हॉट्सअपकडून व्हेरीफिकेशन कोड पाठविण्यात येतो. या कोडद्वारेच नवीन मोबाईलमध्ये वापरकर्त्याचे व्हॉट्सअप सुरु होते. जर समजा चुकून हॅकरला तुमचा व्हेरीफिकेशन कोड मिळाला तर मग तुमच्यापाठी शुक्लकाष्ठ सुरु झालेच म्हणून समजा.

- Advertisement -

समजा ‘अ’ या व्हॉट्सअप वापरकर्त्याने आपला व्हेरीफिकेशन कोड कुणासोबतही शेअर केला तर त्याच्या अकाऊंटचा एक्सेस हॅकरला मिळतो. हॅकरला अकाऊंटचा एक्सेस मिळाल्यास तो अ च्या संपर्क यादीतील सर्व नंबर आणि व्हॉट्सग्रुपशी आपोआपच कनेक्ट होतो. त्यानंतर हॅकर अ ज्या व्यक्तीशी जास्त चॅटिंग करतोय अशा ब व्यक्तिला हेरतो. त्यानंतर ब कडून त्याचा व्हेरिफिकेशन कोड मागितला जातो. ब ला आपण हॅकरच्या जाळ्यात अडकल्याची कोणतीही कल्पना येत नाही आणि ब देखील हॅकरच्या जाळ्यात खेचला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -