घरटेक-वेकWhatsApp चं भन्नाट फीचर! एकदा पाहिलेले MSG आपोआप होणार Delete

WhatsApp चं भन्नाट फीचर! एकदा पाहिलेले MSG आपोआप होणार Delete

Subscribe

इन्स्टंट मेसेजिंग अॅप्लिकेशन व्हॉट्सअॅप त्यांच्या युजर्ससाठी नेहमी नवनवीन फीचर्स लाँच करत असतं. नुकतंच व्हॉट्सअॅपने व्ह्यू वन (View Once) हे फीचर आपल्या युजर्ससाठी आणले आहे. या फीचरअंतर्गत, कोणताही व्हिडिओ किंवा फोटो युजर्स व्ह्यू वन मोड अंतर्गत पाठवू शकतात. या मोडद्वारे पाठवलेले कोणतेही फोटो आणि व्हिडिओ फक्त एकदाच शेअर केले जाऊ शकतात. एकदा फोटो ओपन केल्यानंतर, युजर्स तो पुन्हा पाहू शकणार नाहीत आणि ते इतरांना शेअर करू शकणार नाहीत. यासाठी कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती देणारं ट्विटही केले आहे.

- Advertisement -

व्हॉट्सअॅप हे नवं फीचर केवळ अँड्रॉइडसाठी लाँच करण्यात आले आहे. जर तुम्हालाही हे फिचर वापरायचे असेल तर तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागणार आहे. यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ते अपडेट करू शकतात. या नवीन फीचरसह, इन-अॅप मॅसेज नोटिफीकेशनची स्टाईल देखील बदलली आहे. जेव्हा तुम्ही हा फोटो किंवा व्हिडिओ पाहताच तुम्हाला त्या फोटोऐवजी Opened असा मॅसेज दिसेल आणि तो फोटो किंवा व्हिडिओ गायब होईल. जाणून घ्या तुम्ही हे फीचरचा वापर तुम्ही कसा करू शकतात.

व्हॉट्सअॅपवर फोटो-व्हिडीओ View Once द्वारे कसे पाठवायचे ते पहा

  • सर्वात आधी तुम्हाला ज्या व्यक्तीला मेसेज करायचा आहे त्याच्या चॅट विंडोमध्ये जा. त्यानंतर मेसेज बॉक्सवर क्लिक करा. आता अॅटचमेंट आयकॉनवर क्लिक करा.
  • त्यानंतर गॅलरी ओपन करून तुम्हाला जो काही व्हिडिओ किंवा फोटो पाठवायचा आहे तो निवडा. यानंतर जिथे तुम्हाला कॅप्शन लिहायला सांगितले जाईल, तेथे एक आयकॉन दिसेल ज्यामध्ये 1 लिहिले जाईल. यावर क्लिक करा.
  • त्यानंतर एक पॉप-अप येईल ज्यामध्ये तुम्हाला ओके वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर सेंड आयकॉनवर क्लिक करा.
  • फोटो किंवा व्हिडिओ तुम्हाला आणि तुम्ही ज्यांना हा मेसेज पाठवला आहे त्यांना दिसणार नाही. तो फक्त फोटो असे नाव लिहिलेला दाखवेल. रिसिव्हर त्यावर क्लिक करताच त्याला फोटो किंवा व्हिडिओ दिसेल. त्याच वेळी, तो फोटो बंद करताच, त्याला फोटोऐवजी Opened असे लिहिलेले दिसेल.
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -