आता व्हा एकापेक्षा जास्त फ्रेंड्सना कनेक्ट

व्हॉट्सअॅपने आता एक नवीन फीचर्स लाँच केले आहे. या नवीन फीचर्समध्ये आता 'ग्रुप व्हिडीओ कॉलिंग' करता येणार आहे. हे फीचर्स नुकतेच सुरु झाले आहे.

WhatsApp Video Calling
व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलिंग

प्रत्येकवेळी आपल्या युजर्सला काहीतरी नवे देण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्हॉट्सअॅपने आता एक नवीन फीचर्स लाँच केले आहे. या नवीन फीचर्समध्ये ‘ग्रुप व्हिडिओ कॉलिंग’ करता येणार आहे. फेसबुककडे मालकी हक्क असलेल्या व्हॉट्सअॅपने नुकतेच हे फीचर्स युझर्सला वापरण्यासाठी दिले आहे. ‘ग्रुप व्हिडीओ कॉलिंग’ सुविधा अँड्रॉईड आणि आयओएससाठी लागू करण्यात आली आहे. या फीचर्ससाठी ‘युरोपियन जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन’ची मदत घेण्यात आली आहे.

ग्रुप व्हिडिओ कॉलिंग

हॉट्सअॅपवर ग्रुप चॅटिंगचा ऑप्शन सुरुवातीपासून होताच. त्यानंतर हॉट्सअॅपने ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा दिली होती. मात्र हॉट्सअॅपवरील व्हिडिओ कॉलिंग आता ग्रुप सोबतही करता येणार आहे. व्हिडिओ कॉल दरम्यान एकाच स्क्रिनवर ग्रुपमधील चार लोकांना बघता येणार आहे. त्यामुळे एकाचवेळी चार संवाद साधता येईल.

असे करतात ग्रुप व्हिडिओ कॉलिंग

प्रथम एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल लावावा. त्यानंतर त्या व्यक्तींने फोन उचल्यानंतर डाव्या बाजूला अन्य व्यक्तींना अॅड करण्याचे ऑप्शन येते. त्या ठिकाणी क्लिक करुन आपल्याला ज्या व्यक्तीला कॉल करायचा असेल त्या व्यक्तीला फोन लावावा. या फीचर्समध्ये एका वेळी चार व्यक्ती एकमेकांशी बोलू शकतात.