घरटेक-वेक'व्हॉट्सअॅप पेमेंट' भारतात सुरु होणार नाही?

‘व्हॉट्सअॅप पेमेंट’ भारतात सुरु होणार नाही?

Subscribe

अधिकृत कार्यालय असल्याशिवाय व्हॉट्सअॅप पेमेंट सुरु करु नका सरकारचे आदेश.

जगभरात वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सअॅपमध्ये दिवसोंदिवस बदल होत आहे. युजर्सशी मोठ्या प्रमाणावर जोडण्याचा प्रयत्न करणारे व्हॉट्सअॅप नेहेमीच नवे फिचर लॉन्च करत असते. मात्र व्हॉट्सअॅपद्वारे लॉन्च करण्यात येणाऱ्या या फिचरला भारत सरकारने लाल कंदिल दाखवला आहे. व्हॉट्स पेमेंट सर्व्हिस लॉन्च करण्यासाठी भारतात अधिकृत कार्यालय स्थापन करणे आवश्यक असल्याचे आदेश भारत सरकारने दिले आहेत. कार्यालयाची स्थापना न करता व्हॉट्सअॅप पेमेंट सुरु करता येणार नाही अशी घोषणा इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाद्वारे करण्यात आली. महिन्याच्या सुरुवातीला ही सूचना व्हॉट्सअपला देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपद्वारे होणारे पेमेंट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या देखरेखी खाली करावे लागतील असे आदेश भारत सरकारने दिले. यासर्व अटींमुळे भारतात व्हॉट्सअॅप पेमेंट सर्व्हिसची सुरुवात होण्यास उशीर होणार असल्याचे चित्र आहे.

काय आहे व्हॉट्सअॅप पे?

व्हॉट्सअॅप मॅसेंजर ने पेमेंट करण्याचे फिचर सुरु केलं आहे. फेसबुकच्या मालकीचे असलेले व्हॉट्सअॅपच्या नवीन सेवेद्वारे व्हॉट्सअॅप युजर्सला पैसे ट्रांसफर होणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप वापणाऱ्या युजर्सला व्हॉट्सअॅपद्वारे पेमेंट करता येईल. यासाठी युजर्सला आपले बँक खाते व्हॉट्सअॅपशी लिंक करावे लागतील. भारतातील अॅक्सिस बँक आणि एचडीएफसी या बँकांशी टायअप करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्वावर फक्त काही युजर्सलाच पेमेंटची सुविधा वापरता येणार आहे, नंतर ही सुविधा सर्व युजर्स साठी सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) वर आधारित असलेली ही सुविधा काही बँकांबरोबर भागीदारी करणार आहेत. त्यामुळे खाते असलेल्या बँकांचे पैसे व्हॉट्सअॅपवर ट्रान्सफर करता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -