WhatsApp वर बनवता येणार आत्ता फोटोचे स्टीकर, जाणून घ्या स्टीकर बनवण्याच्या स्टेप्स

WhatsApp web gets new editing tool for customised stickers; here's how to use it
WhatsApp वर बनवता येणार आत्ता फोटोचे स्टीकर, जाणून घ्या स्टीकर बनवण्याच्या स्टेप्स

WhatsApp या लोकप्रिय मॅसेजिंग अ‍ॅपमध्ये दररोज नवनवीन बदल होत असतात. अशातच व्हॉट्सअ‍ॅपने पुन्हा नवा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. WhatsApp वर यापूर्वी एखादे स्टीकर पाठवण्यासाठी तुम्हाला स्टीकर पॅक डाऊनलोड करावा लागत होता. यामुळे व्हॉट्सअ‍ॅपमध्ये फोटो स्टीकर बनवण्याचे फीचर द्यावे अशी मागणी युजर्सकडून होत होती. परंतु युजर्सला आता फोटो स्टीकरसाठी पॅक डाऊनलोड करण्याची गरज नाही. कारण कंपनीने व्हॉट्सअ‍ॅपमध्येच फोटो स्टीकर बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी WhatsApp मध्ये काही टूल्स दिल्या आहेत. या टूल्समध्ये युजर्सला फोटो क्रॉप करण्यासह एडिट करण्याचे ऑप्शन देण्यात आलेत. या टूल्सच्या मदतीने तुम्ही तुम्हाला आवडतील असे स्टीकर तयार करु शकता. ज्यातून एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता. मात्र हे फीचर फक्त मॅक आणि पीसीवरच चालणार आहे. त्यामुळे वेब व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांना याचा आनंद घेता येईल.

WhatsApp या नव्या स्टीकर फीचरसाठी युजर्सला कोणत्याही थर्ड पार्टी ऑप्लिकेशन डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही. यापूर्वी युजर्सला फोटो स्टीकर्ससाठी फोटो क्रॉपिंग, एडिटिंगसारख्या अ‍ॅपची गरज भासत होती. मात्र आत्ता व्हॉट्सअ‍ॅपमध्येच युजर्सला स्टीकरचा आनंद घेता येणार आहे.

स्वत:चे स्टीकर बनवण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

१) सर्वप्रथम web.whatsapp.com वर जाऊन तुमचे व्हॉट्सअ‍ॅप लॉगिन करा.

२) आत्ता ज्या व्यक्तीला किंवा ग्रुपला स्टीकर पाठवायचे आहे त्याला सिलेक्ट करत ओपन करा.

३) यानंतर स्माइली आयकॉनवर क्लिक करत स्टीकर टूल्सवर जा.

४) स्टीकर टूल्सवर क्लिक केल्यानंतर Create ऑप्शन दिसेल.

५) Create वर क्लिक कर फोटोला सिलेक्ट करा.

६) फोटो सिलेक्ट केल्यानंतर वरती अनेक एडिटचे ऑप्शन मिळेल.

७) या स्टीकरवर तुम्ही नवा स्टीकर, स्माइली, टेक्स्ट, पेंट, क्रॉप असे बदल करु शकता.

८) फायनल स्टीकर तयार झाल्यानंतर सेंड ऑप्शनवर क्लिक करा.

९) आत्ता तुम्हाला स्टीकर डाऊनलोड करण्याची गरज लागणार नाही.